Holi Viral Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: आवरा रे ह्यांना! धावत्या स्कुटीवर तरुणींचा अश्लिल डान्स अन् रोमान्स; पोलिसांचा दणका| VIDEO

Holi Viral Video: दोन्ही मुली मागे बसून रंग लगा दे रे गाण्यावर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. तरुणींची ही कृती पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून दोघींवर कारवाईची मागणी केली आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सध्या तरुणाईला लागलेले रिल्सचे वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, चर्चेत येण्यासाठी तरुण- तरुणी काहीही करायला तयार असतात. अनेक धक्कादायक स्टंट करत सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असून त्यामधील तरुणींचा प्रताप पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नुकताच होळीचा सण (Holi Festival 2024) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर होळीची धूम अद्यापही पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती होळीला रंग उधळतानाचे व्हिडिओ बनवत आहे, सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच काही हौशी तरुणींनी होळी खेळत केलेल्या अश्लिल डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro Video) असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन तरुणींच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून त्यांची कृती पाहून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी धावत्या स्कुटीवर बसून अश्लिल डान्स करताना दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, दोन मुली स्कूटरवर बसल्या आहेत आणि एक मुलगा स्कूटर चालवताना दिसत आहे. दोन्ही मुली मागे बसून रंग लगा दे रे गाण्यावर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. तरुणींची ही कृती पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून दोघींवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाची दखल घेत वाहन मालकावर कारवाई करत ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. यानंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांच्या एक्स खात्यातून दंडाची प्रतही शेअर करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT