Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : केहते है मुझको हवा-हवाई; सुसाट दुचाकीवर तरुणीची खतरनाक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल

Girl Stunt Bike Rider : स्कुटीवरून जाताना तिने फक्त हात सोडले नाहीत तर ती डान्स देखील करत आहे. केहते है मुझको हवाहवाई हे गाणं देखील व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. यावेळी तरुणीच्या मागे आणखी एक कार धावत आहे.

Ruchika Jadhav

Video :

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे दुचाकी चालवताना रस्त्यावर ही तरुणी स्टंट करत आहे. हायवेवर भरधाव वेगात दुचाकी चालवताना या तरुणीने थेट हात सोडून दिलेत. तिने स्कुटीचे हँडल न पकडता दुचाकी चालवली आहे.

व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता की, तरुणी फक्त दुचाकी चालवत नाहीये तर ती यावर भन्नाट स्टंट देखील करत आहे. स्कुटीवरून जाताना तिने फक्त हात सोडले नाहीत तर ती डान्स देखील करत आहे. केहते है मुझको हवाहवाई हे गाणं देखील व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. यावेळी तरुणीच्या मागे आणखी एक कार धावत आहे. या कारमधील काही व्यक्तींनी तिचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.

सोशल मीडियावर @Professor of memes या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवर तरुणीला २० रुपयांत अनलिमिटेड मोमोज मिळत असल्याचं कुणीतरी सांगितलं असेल म्हणून ती अशा पद्धतीने जात आहे, असं लिहिलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्हुव्ज मिळालेत. तसेच नेटकऱ्यांनी यावर कमेंटसह लाईक्सचाही वर्षाव केला आहे.

ही तर पापा की परी असं एकाने लिहिलं आहे. तर आणखी एकाने या तरुणीला हवा-हवाई असं म्हटलं आहे. तसेच काहींनी तिची काळजी देखील व्यक्त केलीये. तरुणी तोल जाऊन खाली पडली तर? असे स्टंट करणे फार धोक्याचे आहे, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्यात.

धावत्या दुचाकीवर हात सोडून बसणे तशी सोपी गोष्ट नाही. मात्र या तरुणीने हा स्टंट करायचं ठरवलं आणि तोल जाऊ न देता तिने हा स्टंट देखील पूर्ण केला. ज्या पद्धतीने तिने स्वत:ला बॅलेन्स केलं आहे ते पाहून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वास्तू शास्त्रानुसार 'या' ३ संकेतांकडे दुर्लक्ष करू नये

SCROLL FOR NEXT