Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : कहरच! युनिक बनवण्याच्या चक्करमध्ये पोरीने थेट चष्म्याचे भजी बनवले; अतरंगी रेसिपी व्हिडिओ व्हायरल

Glasses Bhaji Viral Video : बटाटा, कांदा, मिरची असे विविध भजी खाल्ले असतील. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीने पदार्थ नाही तर थेट निर्जीव वस्तूचे भजी बनवले आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video:

सध्या सोशल मीडियावर युनिक रेसिपीचा ट्रेंड सुरू आहे. सर्वजण अनोख्या आणि अतरंगी पद्धतीने नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत. आजवर तुम्ही बटाटा, कांदा, मिरची असे विविध भजी खाल्ले असतील. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीने पदार्थ नाही तर थेट निर्जीव वस्तूचे भजी बनवले आहेत.

शाळेत असताना स्टोनसूप म्हणून एक कथा काहींनी ऐकली असेल. भाजी नसल्याने एक व्यक्ती सर्व मसाले एकत्र करून त्यात दगड टाकतो आणि त्याचं सूप तयार करतो. जेवताना तो दगड फेकून देतो. तसेच काहीसे या तरुणीने केलेय. भजी बनवण्यासाठी काहीच नसल्याने तिने थेट आपला डोळ्यांना लावतात तो चष्मा घेतलाय आणि त्यापासून भजी बनवलेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने भजी बनवण्यासाठी सर्व मीठ मसाले टाकून बेसन पीठ तयार करून घेतलं आहे. त्यानंतर तिने यात डोळ्यांना लावतात तो चष्मा बुडवायला आणि तेलात तळून घ्येला. आता हा चाशम्यापासून बनलेला भजी खाणार तरी कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला एडिट करून मिम्स बनवण्यात आला आहे. हे सर्व काय पाहावं लागतं आहे. बर आहे मला काही दिसत नाही मी आंधळा आहे, असा एका चित्रपटाचा डायलॉग यावर एडिट करण्यात आला आहे.

Glasses Bhaji Viral Video : बटाटा, कांदा, मिरची असे विविध भाजी खाल्ले असतील. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीने पदार्थ नाही तर थेट निर्जीव वस्तूचे भजी बनवले आहेत.

सोशल मीडियावर @punerispeaks या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. काहींनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केलाय. तर काहींनी हास्यास्पद कमेंट केल्यात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गुलाबाच्या फुलांपासून एका महिलेने भजी बनवले होते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी फुलांच्या भजीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर हिट व्हावं आणि फेमस व्हावं म्हणून सर्व जण काही ना काही कला करतात. त्यात जेवणासोबत असं काही कारणे चुकीचं आहे.

बऱ्याच व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळत नाही. त्यामुळे जेवणाचा असा नास करण्यापेक्षा काहींना दान केल्यास त्याचे पुण्य तरी लाभते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT