Girl Leg Wax In Bus Saam TV
व्हायरल न्यूज

Girl Leg Wax In Bus: हेच पाहायचं रहिलं होतं!धावत्या बसमध्ये तरुणीनं केलं लेग वॅक्स; VIDEO तुफान व्हायरल

Ruchika Jadhav

Viral Video:

महिलांना तयार व्हायला फार वेळ लागतो अशी तक्रार अनेक तरुण करतात. आपण सुंदर दिसावं यासाठी काही महिला ट्रेनमधून उतरताना गर्दी नसल्यास केस विंचरताना हमखास दिसतात. अशात एका तरुणीने थेट बसमध्ये वॅक्स केलं आहे. ती वॅक्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी बसमध्ये बसलीये. बसमध्ये प्रवाशांची बरीच गर्दी आहे. एवढी गर्दी असूनही ही तरुणी सर्वांसमोर आपल्या पायांचे वॅक्स करत आहे. लेग वॅक्स करताना तिने बाजारात मिळणाऱ्या स्ट्रीप्सचा वापर केलाय. आपल्या पायावर तिने दोन्ही स्ट्रीप्स ठेऊन वॅक्स केलंय. तिचं हे कृत्य पाहून बसमधील सर्वच प्रवाशी थक्क झाले होते.

बसमध्ये व्यक्ती विरंगुळा म्हणून पेपर वाचणे, गाणी ऐकणे अशा गोष्टी करतात. काही महिला बसमध्ये प्रवासात विणकाम किंवा भाजी निवडण्यासारखी कामे देखील करतात. मात्र एवढ्या प्रवाशांसमोर तरुणीने वॅक्स केलंय. तिच्यासोबत आणखीन एक तरुण देखील आहे. त्याच्याकडे वॅनीटी मेकअप बॉक्स आहे. त्यावरून ही तरुणी एखादी मॉडल असावी असं व्हिडीओ पाहिल्यावर वाटत आहे.

काही माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ दिल्ली किंवा मुंबईतला नाही तर कोलंबियामधील आहे. सोशल मीडियावर तरुणीचं कृत्य आता जोरदार व्हायरल झालंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्यात. तसेच अनेकांनी यावर हसण्याचेही इमोजी पाठवले आहेत. काही व्यक्तींनी तरुणीचं असं वागणं पाहून यावर संताप व्यक्त केलाय.

सोशल मीडियावर फेमस व्हावं यासाठी तरुण तरुणी नेहमीच काही ना काही स्टंटबाजी करत असतात. सोशल मीडियावर स्टंटबाजीचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. याआधी एक तरुणी मेट्रो ट्रेनमध्ये केसांना स्ट्रेटनींग करताना दिसली होती. तर काही तरुण मंडळी दिल्ली मेट्रोत अंघोळ करतानाही दिसले होते. सोशल मीडियावर काही अतरंगीपणा केल्यावर आपण व्हायरल होणार आणि आपल्याला प्रसिद्धी मिळणार या भावनेमुळे अनेक तरुण तरुणी अशा पद्धतीने व्हिडीओ शूट करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Tips: कपाटात खूप झुरळ झाले आहेत? करा 'हे' उपाय

Maharashtra News Live Updates : कास पठारावर फुलांच्या रंगोत्सवाला झाली सुरुवात, पर्यटकांची गर्दी

Special Story : 'लाडक्या बहिणीं'साठी राज्य सरकारांची स्पर्धा; कोणत्या राज्यात किती दिले जातात पैसे? वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi 5: 100 दिवसांचा बिग बॉस मराठीचा शो आता 70 दिवसांत उरकणार? समोर आली ग्रँड फिनालेची तारीख

NCP Party Crisis : घड्याळ चिन्हामुळं कन्फ्युजन होतंय? सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT