Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : लहान मुलांकडे लक्ष द्या! एस्केलेटरवरून उतरताना अचानक मुलीचा पाय अडकला अन्...; व्हिडिओ व्हायरल

girl caught in elevator viral Video : दुसऱ्या देशातील एका मॉलमध्ये एस्केलेटरवर जाताना अचानक मुलीचा पाय अडकल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

योगेश गायकवाड, साम टीव्ही प्रतिनिधी

नवी दिल्ली : आता जगभरातील हॉटेल, मॉल, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन या ठिकाणी एस्केलेटरचा वापर केला जातो. गर्दीच्या ठिकाणी एस्केलेटर अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. या एस्केलेटरमुळे नागरिकांचा चालण्याचा त्रासही कमी होतो. तसेच लोकांचा वेळही वाचतो. सार्वजनिक ठिकाणावरील हे सरकते जिने अर्थात एस्केलेटरचा भारतातही मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. अशाच एका एस्केलेटरवरून जाताना एका मुलीसोबत धक्कादायक घटना घडली. या एस्केलेटरवर उतरताना मुलीसोबतचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या या एस्केलेटरचा फायदाही होतो. तेवढाच धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. या एस्केलेटरमुळे अपघात देखील झाले आहेत. या एस्केलेटरवरून अनेक जण पडले देखील आहेत. तर कोणाचा या एस्केलेटरमध्ये पाय देखील अडल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

एका मॉलमध्ये एका लहान मुलगी एस्केलेटरवरून खाली जात होती. त्यावेळी मुलीचा एस्केलेटरवरून उतरताना त्यात पाय अडकला. या मुलीचा पाय अडकताच संपूर्ण मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मॉलमधील एस्केलेटर थांबवण्यात आलं. एस्केलेटरमध्ये अडकलेल्या मुलीचा पाय मॉलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने खेचला. या अपघातात मुलगी जखमी झाली.

मॉलमधील एस्केलेटवर झालेल्या अपघातामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेकडो प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लहान मुलांना कुठेही घेऊन जाताना त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना एकटे सोडू नका, असे आवाहन केले जात आहे. जगात तंत्रज्ञान विकसित झालं असलं तरी त्याचा फायदा किती आणि कसा करावा, याकडे लक्ष देणं गरजेचे आहे, अशा भावनाही नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT