Girl Holds 3 Tyres Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Girl Holds 3 Tyres Viral Video: नाद करा पण आमचा कुठं; पहिलवानालाही लाजवेल असा तरुणीचा नादखुळा प्लँक VIDEO व्हायरल

Girl Holds 3 Truck Tyres: मुली देखील सुर्दृढ आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करतात. अशात पहिलवानालाही लाजवेल असा एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

Girl Plank Exercise: काही व्यक्ती असं काही करतात की त्यांचा नाद करणं सोप्प नसतं. सोशल मीडियावर अशा व्यक्तींचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. पिळदार शरीरयष्टी असावी प्रत्येकच तरुणाला वाटतं. यासाठी तरुण मुलं मोठ्याप्रमाणावर कसरती करतात. मुली देखील सुर्दृढ आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करतात. अशात पहिलवानालाही लाजवेल असा एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Latest Girl Plank Exercise Video)

चांगल्या फिटनेससाठी प्रत्येक व्यक्ती व्यायाम करतो. या व्यायामावेळी शरीरातील जास्तीची चर्बी हटवण्यासाठी म्हणजेच फॅट बर्न करण्याासाठी प्लँक करतात. या प्लँकमुळे फॅट लवकर बर्न होण्यास मदत होते. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असेलल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी प्लँक करत आहे.

प्लँक करताना तिने कहरच केलाय. यावेळी तिने प्लँक करताना आपल्या पाठीवर दोन मोठे आणि जड टायर ठेवले आहेत. टायरसह तिच्या पाठीवर लोखंडी प्लेट्स देखील आहेत. एवढं वजन अंगावर घेऊन ती प्लँक करताना दिसतेय. तरुणीचा हा व्हिडिओ खरोखर अनेक तरुण मुलांना लाजवणारा आहे.

@imkavy या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडिओला १ मिलीअनहून अधिक व्यक्तींनी पाहिलं आहे. व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करतायत. काहींनी तरुणीच्या जिद्दीला सलाम केलाय. तर अनेकांनी गोड शब्दांत या तरुणीचं कौतुक केलं आहे. @imkavy या इंस्टाग्राम अकाउंटवर तरुणीचे अनेक व्यायाम करतानाचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT