Gondia News Electric Shock Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: करंट लागून मुलगी रस्त्यावर पडली; वृद्धाच्या हुशारीने वाचला जीव, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video: मदतीसाठी ती विव्हळ असते. अंगात करंट फिरत असल्याने तिला वेदना होत असतात.

साम टिव्ही ब्युरो

Delhi Viral Video:

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की ते पाहिल्यानंतर खूप मजा येते. एखाद्या व्यक्तीचे मनोरंजनही होते. परंतु काही व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवून देणारे असतात. (Latest Marathi News)

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका मुलीला विजेचा शॉक लागलाय. मुलगी रस्ता ओलांडताना तिला विजेचा धक्का बसतो आणि ती तिथेच कोसळते. मदतीसाठी ती विव्हळ असते. अंगात करंट फिरत असल्याने तिला वेदना होत असतात. व्हिडीओमध्ये तेथे उपस्थित काही व्यक्ती कपड्याच्या मदतीने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, या मुलीला शॉक लागल्याने तिला जागेवरुन उठताही येत नाहीये. तिच्या जवळ आपण गेल्यावर आपल्यालाही करंट लागेल या भीतीने अनेक जण तिथे बघ्याच्या भूमीकेत आहेत.

या मुलीच्या वेदना तेथे असलेल्या एक आजोबांना पाहवत नाहीत. ते तातडीने तिला वाचवण्यासाठी आपला रुमाल तिच्या दिशेने फेकतात. मात्र त्याने आपल्यालाही करंट लागण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या लक्षात येते.

त्यामुळे ते हातात एक लाकडी काठी घेतात आणि मुलीला बाहेर खेचतात. ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वृद्ध व्यक्तीने दाखवलेलं धाडस पाहून सारेच त्यांचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT