Drunk Girl Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Girl Viral Video: मद्यधुंद तरुणीचा हॉटेलमध्ये राडा, समजूत काढणाऱ्या वेटरलाच चावली; लोकांची पळापळ

Drunk Girl Video: दारुच्या नशेत असलेल्या तरुणीची समजूत काढण्याचा वेटरने प्रयत्न केला. मात्र, तिने थेट वेटरच्या हातालाच चावा घेतला.

Satish Daud

Drunk Girl Viral Video

३१ डिसेंबरला मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणीने थेट हॉटेलमध्येच राडा घातला. दारूच्या नशेत टुल्ल झालेल्या या तरुणीने हॉटेलमधील लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी वेटरने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, तरुणीने थेट वेटरच्या हातालाच चावा घेतला. तरुणीच्या या कृत्यामुळे हॉटेलमधील इतर लोक धास्तावले होते. यानंतर हॉटेलमधील स्टाफने तरुणीला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील ही तरुणी कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की एका हॉटेलमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची पार्टी सुरू आहे.

या पार्टीत एक तरुणी दारुच्या नशेत टुल्ल झाल्याचं दिसून येतंय. ती हॉटेलमधील इतर लोकांना शिवीगाळ करत असल्याचं सांगितलं जातंय. तरुणीचं हे वागणे बघून हॉटेलमधील एक वेटर तिथे येतो आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ही तरुणी थेट वेटरच्या हातालाच चावते.

या प्रकारामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडतो. दरम्यान, तरुणीचे मित्र आणि हॉटेलमधील इतर स्टाफ तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तरी देखील ही तरुणी कुणाचेही ऐकत नाही. ती जमिनीवर लोळण घेत नाटक करण्यास सुरुवात करते.

या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने शेअर होत आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील आहे, हे समोर आलेलं नाही. @gharkekalesh नावाच्या X अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT