Gautami Patil Viral Video Gautami Patil Video
व्हायरल न्यूज

Gautami Patil Viral Video: बाळ रडतंय तरी गौतमीसोबत फोटो पाहिजेच; आईचा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Gautami Patil Video : कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ असल्याने तिच्यासोबत असलेलं बाळ रडू लागतं. बाळं रडत असताना देखील महिला गौतमीसोबत सेल्फी घेण्याचा आग्रह करते.

Ruchika Jadhav

कलाकारांना भेटणे त्यांचा ऑटोग्राफ किंवा सेल्फी घेणे यासाठी चाहते किंवा प्रेक्षकवर्ग नेहमीच आग्रही असतो. कलाकारांसोबत फोटो घेताना झालेल्या वादाचे आजवर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता देखील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओपाहून संताप व्यक्त करावा की हसावं असा प्रश्न तुमच्याही मनात येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सबसे कातील म्हणून चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलची मंदिरात एका महिलेशी भेट झाली आहे. गौतमीसोबत एक सेल्फी मिळावा यासाठी ही महिला धडपड करत आहे. कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ असल्याने तिच्यासोबत असलेलं बाळ रडू लागतं. बाळं रडत असताना देखील महिला गौतमीसोबत सेल्फी घेण्याचा आग्रह करते.

लहान मुलांना जराही गर्दी दिसली तरी ते रडतात आणि गोंधळ घालतात. त्यामुळे आई किंवा बाबा यांना बाहेल फिरण्यासाठी गेल्यावर स्वत:ची हवी तशी हौस मौज करता येत नाही. तसंच काहीसं या महिलेसोबत घडत असावं.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिलेने आपलं बाळ गौतमीच्या हातात दिलं आहे. बाळ रडत असल्याने त्याला शांत करण्यासाठी गौतमी देखील त्याला खेळवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. मात्र बाळ काही रडायचं थांबत नाही. त्यामुळे त्याची आई त्याला शांत न करता पटकन एक सेल्फी घेते आणि तेथून निघून जाते.

तेथून गेल्यानंतर नक्कीच त्या बाळाच्या आईने त्याला शांत केलं असणार. मात्र एवढ्याशा गोष्टीवरून नेटकऱ्यांनी महिलेला धारेवर धरलं आहे. कमेंटमध्ये महिलेसह गौतमीवर टीका केल्या आहेत. आईला मुलापेक्षा गौतमी महत्वाची आहे का?, असा सवाल काहींनी विचारला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर @marathi_memer_2.0 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. तसेच व्हिडिओ जोरदार व्हायरलही होत आहे. फोटो झाल्यानंतर गौतमी बाळाला आईकडे देताना त्याला किस करून प्रेम व्यक्त करते. मात्र तरिही एका नेटकऱ्याने म्हटलंय, लेकरू रडतंय हे पाहून गौतमी पाटीलचा पण चेहरा बिघडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

SCROLL FOR NEXT