Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: पठ्ठ्यानं थेट गॅस सिलिंडर पेटत्या शेगडीवर ठेवला; चहा बनवण्यासाठी भलताच जुगाड

Gas Cylinder Viral Video: चहाची तलब कशी मिटवायची म्हणून या व्यक्तीने थेट काहीसा विचित्र आणि जीवघेणा जुगाड शोधून काढला. त्याने गॅस सिलिंडरची रिकामी टाकी पेटत्या शेगडीवर ठेवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video:

एखादं काम आवडलं की आपण त्यावर पर्याय शोधत असतो. मात्र अनेकवेळा पर्यायी वस्तू उपलब्ध होत नाहीत. त्यावेळी व्यक्ती थेट जुगाड शोधतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक जुगाडू व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती चहा बनवत आहे. आता चहा बनवताना नेकमा गॅस संपला. मात्र चहाची तलब कशी मिटवायची म्हणून या व्यक्तीने थेट काहीसा विचित्र आणि जीवघेणा जुगाड शोधून काढला. त्याने गॅस सिलिंडरची रिकामी टाकी पेटत्या शेगडीवर ठेवली आहे.

रिकामी टाकी पेटत्या शेगडीवर ठेवल्यास गॅस संपत नाही असं काही या व्हिडीओत दिसत आहे. तरुणाचा हा जुगाड पाहून सारेच थक्क झालेत. आता हा जुगाड किती खरा किती खोटा या बद्दल माहिती मिळाली नाही. शेगडीवर एका बाजूला चहाचा मोठा टोप आहे तर दुसऱ्या बाजूला गॅस सिलिंडरची टाकी आहे.

@subbuthallam या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. काहींनी येथे स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर काहींनी तरुणाने केलेला जुगाड विज्ञानानाशी संबंधित आहे असं म्हटलं आहे.

गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेट संपली असल्यास किंवा अन्य काही कारणांनी गॅस सिलिंडरला आग लागल्याचा आजवर अनेक घटना घडल्या आहेत. तसेच घरामध्ये आग लागल्यावर काही वेळा तेथे असलेले गॅस सिलिंडर फुटल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता देखील हा व्हिडिओ पाहून अनेकांनी स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT