Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : पुणेकर तरुणाची भन्नाट आयडिया; नवरीच्या शोधासाठी ढोलवर लावलं पोस्टर, अटही चर्चेत

Viral News : पुण्यातील एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Viral Video :

लग्नासाठी मुलांना मुली मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात लग्नाळू तरूणाने नवरी मिळण्यासाठी चक्क ढोलवर लग्नासाठी मुलगी पाहिजे, असं पोस्टर लावलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई, पुण्यासह सपूंर्ण राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. पुण्यातही ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळाला. अशातच एका लग्नासाठी आतूर तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या समोर येतात आहे. पुणेकरांची कल्पकता यातून दिसून येते. तरुण मंडळी पुण्याची ही परंपरा आता जिथे संधी मिळेल तिथे जपत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पुण्यातील ढोल ताशा पथकात ढोल वाजवणाऱ्या तरूणाने चक्क ढोलवर लग्नासाठी मुलगी पाहिजे असं पोस्टर लावलं. त्यात तरूणाने फ्लॅट , पगार आणि लग्नासाठीची खास अट असं सगळं लिहिलं आहे. आई वडिलांना सोडून राहणार नाही, असं सांगायला हा तरुण विसरला नाही. तरुणाना हा व्हिडीओ मजेशीर आहे पण एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT