Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral: गर्लफ्रेंडचा बर्थडे, १२ कारसोबत स्टंटबाजी..., गँगस्टरने चक्क DCP ऑफिससमोरच केलं जंगी सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. तुम्हीही व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच.

Tanvi Pol

kanpur News: गेल्या काही वर्षापासून वाढदिवस सेलिब्रेशन विविध पद्धतीने करताना पाहतो. सोशल मीडियावर तर दर एका दिवसाला मोठ्या थाटात काहीजण वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असतात, मात्र काही व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात,सध्या कानपुरमधील एका वाढदिवस सेलिब्रेशन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे, ज्यात चक्क एका गँगस्टरने बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडचा बर्थडे डीसीपी ऑफिससमोरच केलेला आहे.

कापूरमध्ये काय चाललंय?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सर्वत्र काळ्या रंगाची एक कार दिसते मात्र काही वेळाते त्याच्यापाठोपाठ अनेक कार आहेत. काही काळ्या रंगाच्या कारवर एकही नंबर प्लेट दिसून येत आहे. ज्या वेळेस पहिला कार येते तेव्हा पुढच्या सीटवर एक तरुणी बसली असून ती खिडकीच्या बाहेर पाहताना दिसते. मग काही काही वेळाने संपूर्ण कार गोलाकार स्टंटबाजी करताना दिसत आहेत. संपूर्ण व्हिडिओ त्यांच्यापैकी एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला आहे.

कानपुरमधील व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून एका नेटकऱ्याने ''@Simerchawla20''त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे सविस्तर माहिती लिहिण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर व्हिडिओला आतापर्यंत हजारो नाही तर लाखो नेटकरी वर्गाने पाहिलेला आहे शिवाय लाईक्सही व्हिडिओला मिळत आहेत.

नेटकऱ्यांचा संताप आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया

सर्व धक्कादायक प्रकार अनेक नेटकऱ्यांनी पहिल्यांदा पाहिला आहे. त्यामुळे कमेंटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत, कमेटबॉक्समध्ये एका यूजरने लिहिले आहे,''या सर्व लोकांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, कानपूर पोलिसांनी अशा लोकांना सोडू नये'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे लोग चुकीचा संदेश देत आहात. खाकीची भीती आता राहिली नाही, अशा लोकांना घाबरायला हवे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत'',अशा अनेक संतापजनक आणि कारवाई करण्याची मागणी करण्याऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT