Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नाशिक हादरले! पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या युवकावर टोळक्याचा हल्ला; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik News: नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ज्यात तरुणावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे. नेमकी घटना कशी घडली आणि त्याचे कारण काय ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Cctv Viral Video: नाशिक शहर एका घडलेल्या प्रकारामुळे हादरले आहे. एक युवक नाशिकमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता काही अज्ञात गावगुंडांनी मारहाण करत त्यावर प्राणघातक हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव कृष्णा धात्रक असे आहे. कृष्णा हा वाहनामध्ये घाडगे मळा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. पण तिथे असलेल्या गाव गुंडांनी कृष्णाला मारहाण(FIGHTING) करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झालेला आहे.

हल्ल्याचा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून गंभीर जखमी असलेल्या युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

परिसरात टवाळखोरांचा वाढता हैदोस

गेल्या काही दिवसांपासून शांतीनगर ते घाडगे मळा परिसरात टवाळाखुरांचा हैदोस वाढला आहे. मात्र, असे असतानाही पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका आहे असे नागरिक म्हणत आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये टवाळखोरांचा हैदोस वाढल्याने भीती पसरली आहे. सध्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT