Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भावाने नादच केला.. लग्नाचा बायोडेटा घेऊन रस्त्यावर राहिला उभा, पुण्यातल्या व्हिडीओने लक्ष वेधलं!

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तरुणाने काय केले आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: सध्या तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही, अशी समस्या होत चालली आहे असे तुमच्या कानावर कायम ऐकायला येत असेल. मात्र सध्या अनेक तरुणी उशिरा लग्न करताना दिसून येतात त्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही. अनेकदा लग्न जमत नसल्याने काही तरुणांनी जीवन संपवले आहे. अनेक अशा घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर एका लग्नाळू तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या तरुणाने लग्न जुळण्यासाठी जे काही केले आहे ते पाहून प्रत्येकजण हैराण होईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक तरुण हातामध्ये एक पोस्ट घेऊन रस्त्यावर येत आहे. व्हिडिओतील पोस्ट तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला त्यावर तरुणाचा लग्नासाठी छापलेला बायोडेटा दिसेल. ज्यावर तरुणाचे नाव आणि बरीच माहिती लिहिलेली आहे. व्हिडिओत पुढे असे दिसते की तरुण एका रस्त्याच्या कोपऱ्यात थांबतो आणि येणारी शिवाय जाणारी प्रत्येक व्यक्ती तरुणाच्या हातातील पोस्ट वाचून हसताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@vabsnation_29'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ,''लग्नाचा बायोडाटा'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच लाखोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला असून बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आता लगेच लग्नासाठी मुलगी भेटेल'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT