Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मोठ्याल्या पोरांना पगार सुरू केला, बारक्यांनी घोडं मारलं का? भुऱ्याचा सरकारला सवाल

Kartik Vajir Viral Video : सोशल मीडियावर कायम लहान मुलांचे अनेक गंमतशी व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवाय भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज उत्सव देशभर साजरा केला जात आहे. ज्यात अनेक मोठ-मोठ्या व्यक्तींची भाषणे होत आहेत,मात्र सोशल मीडियावर सध्या स्वातंत्र्यदिनी भुऱ्याने अर्थात कार्तिक वजीर याने केलेल्या भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोठाल्या पोरांना सरकार ने पगार सुरू केलाय आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात असं म्हणत कार्तिक वजीर याने सरकारकड सरसकट मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केलीय. तर आज स्वातंत्र्यदिनी बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न विचारला आहे.

सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं असं म्हणत त्याने लहान मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल (independence)प्रश्न उपस्थित केले आहे. तर स्वातंत्र्यदिनी भुऱ्याने केलेल्या भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.

नक्की काय म्हणाला भुऱ्या?

आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं,इंग्रजकडू होते जुलमी होते पण आपल्या क्रांतिकारी लोकांनी त्यांना पाणी पाजलं.आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपल्यासारख्या बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का?कुणी येत आणि मलाच काम सांगतं.सुट्टी (holiday)असली की घरचे काम रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं.

सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार.पगार सुरू झाल्यामुळे ते गेम खेळत बसणार आणि रानात पण काम करणार नाही.आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं, आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्च पाण्याला पैसे लागतात.सरकारने बारीक-सारीक लाडका लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा.आता सर्वांनाच पगार (salary ) सुरू झाली, हे सगळं बंद करा.अशाने आळशी पिढी तयार होईल, मग पुन्हा इंग्रजी येऊन तुम्हाला गुलाम करतील.शहाणे व्हा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT