Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: ही कसली जीवघेणी मस्करी! उंच डोंगरावरून मित्रांनी त्याला खाली लटकवलं; काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

Friends Masti Video Viral: सध्या सोशल मीडियावर मित्रांच्या मजा, मस्ती आणि मस्करीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून एका क्षणासाठी तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.

Ruchika Jadhav

Friends Video Viral:

मित्र मित्र (Friend) एकत्र आल्यावर काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. मस्करी आणि मस्तीच्या मुडमध्ये ही मुलं कधी कधी असं काही करतात ज्याने एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतं. सध्या सोशल मीडियावर मित्रांच्या मजा, मस्ती आणि मस्करीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून एका क्षणासाठी तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण एका ठिकाणी फिरण्यासाठी आलेत. मस्तीच्या मुडमध्ये असेली मुलं अनेकदा एकमेकांची खोड काढतात. या तरुणांनी देखील अशीच मस्ती करताना त्यांच्या एका मित्राला उंचावर डोंगरावारून खाली लटकवलं आहे. व्हिडीओपाहून एकाक्षणासाठी हा तरुण आता खाली पडणार की काय असं दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तीन मुलं उंच दगडावर उभे आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला खाली लटकवलंय. त्याचे हात त्यांनी धरून ठेवलेत. हा तरुण खाली उतरत आहे की, वरती येत आहे? असा प्रश्न व्हिडीओ पाहताना पडतोय. तर या तरुणाचे अन्य दोन मित्र खाली उभे आहेत. व्हिडीओ पाहताना सुरूवातीला ही खोल दरी असावी असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच नाही.

हा दगड डोंगरावर उंच जागी आहे. मात्र ७ ते ८ फुटांवर लगेचच खाली सपाट जागा देखील आहे. त्यामुळे तरुणाचे अन्य मित्र तेथे येतात आणि त्याचे पाय पकडून त्याला खाली उतरण्यास मदत करतात. मित्रांनी केलेली ही मस्करी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात. आपण या मुलाला फार उंचावरून वाचवतोय, असं भासवण्यासाठी वेगळ्या अँगलने हा व्हिडीओ काढण्यात आल्याचं दिसतंय.

तर काही नेटकऱ्यांनी तरुणांच्या या व्हिडीओवर संतापही व्यक्त केला आहे. @Malik Tahleel या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ (Video) पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्हुव्ज मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

SCROLL FOR NEXT