Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लोकलमधून उतरल्या अन् दे दणा दण... प्लॅटफॉर्मवरच झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO तुफान व्हायरल

Women Fight Viral Video: सध्या काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.ज्यात होत असलेली हाणामारी ट्रेनमध्ये झालेली नसून रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेली आहे.

Tanvi Pol

Railway Station Fight: मुंबई लोकलमध्ये वारंवार महिलांमध्ये आपण वादविवाद होत असताना पाहत असतो.अनेक क्षुल्लक गोष्टींवरुन हे वाद अगदी टोकाला जात असतात.मात्र झालेले वाद स्टेशनवर उतरेपर्यंत संपतात,सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ महिलांच्या हाणामारीचा आहे,मात्र तो लोकल ट्रेनमधील नसून थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरील आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रेल्वे स्टेशन दिसून येत आहे.या रेल्वे स्टेशनवर एक लोकल ट्रेन थांबलेली दिसत असून या लोकलच्या दरवाजात अनेक प्रवासी थांबलेले आहेत,अशातच रेल्वे प्लॅटफॉर्मवरच काही महिलांमध्ये जोरदार राडा सुरु असलेला दिसत आहे काही वेळात याच महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरु होते.मात्र त्यातील काही महिला सुरु असलेली हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

महिलांच्या हाणामारीचा(Girls Fighting) व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे,मात्र तो इन्स्टाच्या 'domumbai' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होतात तुफान व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत तर अनेक लाईक्सही व्हिडिओला मिळालेले आहेत.

ऐवढेच नाही तर महिलांच्या या हाणामारीच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''काय बिकट अवस्था आहे राव''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''म्हणूनच तर हल्ली मुली भजन करण्याच्या निमित्ताने पुरूषांसोबत जास्त सुरक्षित आणि आनंदात प्रवास करतायत''तर काही यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT