Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र खतरनाक! शायनिंगमध्ये एन्ट्री मारायला गेले अन् फजिती करून बसले, फेअरवेल पार्टीतला व्हिडीओ व्हायरल

Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात ते फेअरवेल पार्टीमध्ये हटके एन्ट्री मारण्यासाठी जातात,मात्र नक्की पुढे काय घडते ते एकदा तुम्ही पहा.

Tanvi Pol

Viral News: कॉलेज असो वा शाळेतील फेअरवेल पार्टी आपल्यापैंकी प्रत्येकाच्या कायम आठवणीत राहते.फेअरवेल पार्टीमध्ये जाण्यासाठी प्रत्येकजण कपड्यांपासून अनेक भन्नाट कल्पना तो दिवस खास बनवण्यासाठी करत असतो.सध्या सोशल मीडियावर अशाच एका फेअरवेल पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात काही तरुणांना फेअरवेल पार्टीमध्ये धावत्या गाडीवरुन एन्ट्री करणं महागात पडलं आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,काही तरुण एका वाहनाच्या टपावर बसलेले आहे.व्हिडिओत दिसणाऱ्या चारही तरुणांनी काळ्या रंगाचे ब्लेजर परिधान केलेले आहेत.फेअरवेल पार्टीमध्ये हटके एन्ट्री मारण्याची यांची इच्छा होती,त्यासाठी ते वाहनाच्या टपावर बसले मात्र गाडी सुरु झाली आणि वेगवान होऊन काही अंतरावर गेली,त्या क्षणी गाडीचा ब्रेक दाबल्याने चौघही वाहनाच्या टपावरुन थेट जमिनीवर कोसळले.

तरुणांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ इन्स्टावरील ''top_model_khariar''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी पोस्ट होताच तब्बल ३० हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहेत शिवाय मिनिटा मिनिटाला अनेक व्ह्यूज मिळत आहेत.

ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया या कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बनवा अजून रील्स'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''काय गरज होती असे रील्स करायची'',अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया केल्या असून अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT