Saam Tv
व्हायरल न्यूज

एक नंबर तुझी कंबर....मराठी गाण्यावर परदेशी मुलांचा डान्स बघा तर खरं, म्हणाल, 1 नंबर

Foreigners Dance Video: सोशल मीडियावर आजवर अनेक डान्स व्हिडिओ पाहिले आहेत. सध्याचा व्हायरल होत असलेला डान्स व्हिडिओ काहीसा हटके आहे. कारण काय ते व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Viral Dance Video: मराठी गाण्यांचं वेड आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याची गाज परदेशापर्यंत पोहोचलेली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक धमाकेदार डान्स व्हिडीओ, ज्यामध्ये काही परदेशी चिमुकली 'एक नंबर तुझी कंबर' या मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

हा डान्स(Dance) व्हिडीओ पाहताच एक क्षणासाठी विश्वास बसणार नाही की हे लोक महाराष्ट्राचे नाहीत! त्यांच्या एक्सप्रेशनमध्ये आणि लयीत इतकी सफाई आहे की, कुणीही म्हणेल, "हे तर आपलेच आहेत!" 'एक नंबर तुझी कंबर' हे मराठी लोकप्रिय गाणं जे आपल्या ताल आणि ठसक्यामुळे तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

या व्हिडीओत डान्स करणाऱ्या कलाकारांमध्ये कोणतीही मराठी भाषेची माहिती नसतानाही त्यांनी गाण्याचे शब्द, त्यातील ताल, आणि हावभाव इतक्या अचूकतेने पकडलेत की, पाहणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात. सोशल मीडियावर व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील masakakidsafricana या अकाउंटवर ४ जून रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत. तर अनेक मराठी नेटकऱ्यांनी मराठी भाषेत त्यांच्या डान्सचे कौतुक केले आहे तर अनेकांनीही कौतुकास्पद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Maharashtra Live News Update: अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, जरांगेंनी दिला इशारा

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

Maratha Andolan : मराठा आंदोलकांवरील ८२६ पैकी केवळ ८६ गुन्हे मागे | VIDEO

SCROLL FOR NEXT