Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फटाक्यांच्या आतषबाजीतून अनर्थ घडला; मंडपाला लागली आग; भयानक व्हिडिओ आला समोर

Nanded Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली ही घटना एका लग्न संमारभातील आहे. जिथे नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Fire Accident Video: लग्नसमारंभात फटाक्यांची आतषबाजी करणे चांगलंच महागात पडलं आहे. मंडपाच्या जवळ फोडलेल्या फटाकांनी पेट घेतल्याने संपूर्ण मंडपाने आगीने वेढला. पाहता पाहता आग इतकी भडकली की मंडपातील सजावट आणि साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लग्नाचा सगळा उत्साह क्षणात मावळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरी काय?

ही घटना महाराष्ट्रातील नांदेडच्या कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव येथे घडली आहे. जिथे घराबाहेर मंडप सजलेला होता. पाहुण्यांची रेलचेल सुर होती. सर्व काही आनंदी होते. तेवढ्यातच फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरु करण्यात आली. ज्यात लग्न मंडपाच्या बाजूला फटाके उडवले आण लग्न(Wedding) मंडपाला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

व्हायरल होत असलेली ही घटना 20 मार्च रोजीची असल्याचे समोर आले, असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया आणि लोकांनी लाईक्स आणि व्ह्यूजही मिळवून दिलेले आहेत.

सध्या हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''नांदेडमध्ये लग्नात फटाक्यांमुळे मंडपाला आग! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल'' असे लिहिण्यात आलेले आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अशा भयानक घटनांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

SCROLL FOR NEXT