Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर बाजारात महिलांची हाणामारी; व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात माराल. व्हायरल होत असलेल्या घटनेत नेमके काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Women Fighting Video: शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारपेठेत दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. ग्राहकांनी गजबलेल्या बाजारात ही घटना घडल्याने काही वेळासाठी तिथे तणाव निर्माण झाला होता. काहींनी मोबाईलमध्ये ही हाणामारी कैद केली असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरी काय?

घडले असे की, बाजार नेहमी प्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरु होती. मात्र, याच गर्दीतून दोन महिलांचा वाद (Argument) सुरु झाला. सुरुवातीस एकमेंकीवर फक्त त्या ओरडत होत्या. काही क्षणात हा वाद इतका वाढला की त्या हातघाईवर येऊन मारहाण करु लागल्या. पण त्यातील एक महिला मार खावून घेत होती आणि दुसरी तिला मारत होती. नेमका हा वाद कशामुळे सुरु झालेला आहे ते अद्याप समजू शकलेले नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

महिलांच्या हाणामारीमुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण होते. विक्रेते आणि ग्राहक हैराण झाले. पाहता पाहता हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला आणि तो आता इन्स्टाग्रामवरील mr__koushik90 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी मोठी पसंती दिलेली आहे.

ही घटना पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अनेकांनी महिलेच्या या वर्तनांवर टीका केलेली आहे. तर काहींनी म्हटलं की,''महिला कुठेही आणि कधीही हाणामारी(Fighting) करु शकतात'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''नागरिकांना फ्रीमध्ये शो पाहण्यासाठी मिळाला'' अशा अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Offer: जिओ यूजर्ससाठी खास ऑफर, २% जिओ गोल्ड, अनलिमिटेड 5G डेटा अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला डॉक्टरांचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

Sangli : मानाचा नारळ ४१ हजार रुपये, कोथिंबीर जुडी २० हजारात खरेदी; महाप्रसादातील वस्तूंचा लिलाव

SCROLL FOR NEXT