Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: 'पहाडी सॉन्गवर' बाप-लेकीचा जबरदस्त डान्स, आई बघतच राहिली, पाहा VIDEO

Viral Dance Video: सोशल मीडियावर पप्पाच्या परीचे गमतीदार तसेच डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. मात्र अशातच सोशल मीडियावर एका मुलीचा आणि तिच्या वडिलांच्या डान्स व्हिडीओचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Father Daughter Dance Video

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यात ट्रेडिंगमध्ये एखादं गाणं असेल तर त्याचे अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 'पहाडी सॉन्ग' मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर अनेकांनी आपले व्हिडीओ तयार केले आहे. वडील आणि मुलीचा या गाण्यावरील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घरातील आहे. त्याच घरातील रूममध्ये वडील आणि मुलगी डान्स करताना दिसत आहे. मुलीने लाल, काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, तर वडिलांनी सफेद, राखाडी रंगाचा शर्ट घातलेला आहे. डान्स करताना दोघांची केमिस्ट्री उत्तम दिसत आहे. दोघांच्या स्टेप्स देखील एकदम मॅच करत आहेत. त्यांच्या पाठीमागे मुलीची आई बसलेली आहे आणि पती आणि मुलीच्या डान्सची मजा घेत आहे.

डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @yodhakandrathiया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये'वडील आणि मुलीचा डान्स' असे लिहिले आहे. सोशल मीडियावर 'गुलाबी शरारा' गाण्यावर सेलिब्रेटीपासून अनेकांनी रिल्स बनवल्या आहेत.

बाप-लेकीच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.या व्हायरल व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स येत आहेत. तसेच व्हिडीओ सर्व सोशल साईटवरही शेअर केला जातोय. व्हिडिओला चार लाख व्हयूज मिळाले असून , साधारण एक्यानव्व हजारापर्यंत लोकांनी व्हिडिओला पंसती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT