Cancer Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check : जेजेमध्ये कॅन्सरवर निदान करणारी गोळी? काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Fact Check of jj hospital message : आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची...हार्ट अॅटॅकची आता चिंताच सोडा असं म्हणत 5 हजारांत हार्ट ब्लॉकेजवर उपचार जेजे रुग्णालयात असल्याचा दावा करण्यात आलाय.इतकंच नव्हे तर एक गोळी कॅन्सरवर निदान करते असाही दावा करण्यात आलाय. हार्ट आणि कॅन्सरचे देशात लाखो रुग्ण आहेत...त्यामुळे अशी सुविधा जेजेमध्ये आहे का? हे आम्ही जाणून घेतलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Mayuresh Kadav

मुंबई : हार्ट ब्लॉकेज फक्त 5 हजारांत काढले जातात, तेही मुंबईल्या जेजे रुग्णालयात असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. इतकंच नव्हे तर एक गोळी कॅन्सरचं निदान करते असा दावा करण्यात आलाय. ही नवीन टेक्नॉलॉजी असून, आता हार्ट अॅटॅकची चिंताच सोडा असं सांगितलं जातंय. इतकंच नव्हे तर ही टेक्नॉलॉजी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून फक्त 5 हजार रुपयांत उपचार होत असल्याचा दावा केला जातोय. व्हायरल मेसेजसोबत एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आलाय. आता या व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलंय पाहा..

व्हायरल मेसेज म्हटलं आहे की, आता हार्ट अटॅकची चिंता सोडा. नवीन तंत्रज्ञान जे जे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आलंय. फक्त 5 हजार रुपयांमध्ये हार्ट ब्लॉकेज डायरेक्ट काढले जातात आणि एक गोळी अन्ननलिकेचा कॅन्सरचं निदान करतं'. या मेसेजसोबत एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आलाय.

व्हिडिओमध्ये काय दावा करण्यात आलाय?

बऱ्याच जणांना हार्टचा प्रॉब्लेम असल्यानं हा महत्त्वाचा विषय आहे...फक्त 5 हजारांत असा उपचार मिळत असल्याचा दावा करून व्हिडीओ व्हायरल केल्यानं अनेकांनी यावर विश्वास ठेवलाय...खरंच जेजे हॉस्पिटलमध्ये 5 हजार रुपयांत हार्ट ब्लॉकेजवर उपचार मिळतात का...? एक गोळी कॅन्सरवर निदान करते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने आम्ही टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या प्रतिनिधीने जेजेमध्ये जाऊन अशी टेक्नॉलॉजी आहे का...? याबाबत जाणून घेतलं.

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

व्हायरल झालेला व्हिडीओ केब्रिज विद्यापीठाचा

व्हायरल व्हिडीओतील टेक्नॉलॉजी कॅन्सरवर निदान करण्यासाठी

जेजे रुग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत होतात...

अन्ननलिकेचा कॅन्सर शोधण्यासाठी एन्डोस्कोपी आणि बायोप्सी करण्याची आवश्यकता असते

कॅन्सर शोधण्यासाठी कोणतेही गोळी आलेली नाही.

त्यामुळं आमच्या पडताळणीत जेजे हॉस्पिटलमध्ये फक्त 5 हजार रुपयांमध्ये हार्ट ब्लॉकेज आणि एक गोळी कॅन्सरचं निदान करते हा दावा असत्य ठरला. जे.जे. रुग्णालयाच्या नावाने खोटी माहिती व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय...त्यामुळे प्रशासनाने अशा खोट्या माहितीबद्दल दूर राहण्याचे आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT