Fact Check Viral message claims ₹10,000 for beggars, but the scheme applies only in Bihar, not Maharashtra. Saam Tv
व्हायरल न्यूज

भिकाऱ्याला मिळणार 10 हजार रुपये? सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना?

Fact Check On Viral Message Claiming 10000 Rupees For Beggars: व्हायरल होत असलेल्या मेसेजची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...असाच एक व्हायरल मेसेज आमच्या हाती लागलाय...भिकाऱ्यांना आता सरकार 10 हजार रुपये देणार असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

भिकाऱ्यांनाही आता 10 हजार रुपये मिळणार आहेत...हे ऐकूनच सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल...आता हा मेसेज व्हायरल होत असून, यावरून काहींनी कौतूक केलंय तर काहींनी मेसेज पाहून खिल्ली उडवलीय...खरंच ही योजना असेल तर भिकारीमुक्त राज्य नक्कीच बनेल...पण, अशी सरकारची योजना आहे का...? खरंच भिकाऱ्यांना सरकार 10 हजार रुपये देणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

सरकारकडून 10 हजार रुपये भिकाऱ्यांना दिले जाणार आहेत. भिकारी भिक्षा मागत फिरू नये, यासाठी ही योजना आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...ही खरंच योजना असेल तर चांगली गोष्ट आहे...कारण, भिकारीमुक्त राज्य यातून बनण्यास मदत होईल...याची आम्ही पडताळणी करण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

भिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची योजना नाही

बिहार सरकार भिकाऱ्यांना 10 हजार देणार

भिकाऱ्यांची ओळख पटवून मुख्य प्रवाहात आणणार

भिकाऱ्यांना सामूहिक बचतीबद्दल शिक्षित केलं जातं

भिक्षा मागणे सोडणाऱ्यांना 10 हजार दिले जातात

भिक्षा प्रतिबंधक योजनेअंतर्गत सरकारच्या निधीतून रोजगार मिळतो...सध्या ही योजना बिहारच्या 10 जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आलीय...सेवा कुटीरमधून काही स्वयंसेवक मंदिरे, मशिदी, बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांवर जाऊन भिकाऱ्यांना शोधतात...सध्या, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या भिक्षूंसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय...ही योजना लोकांना भिक्षा मागण्याच्या भ्रमंतीपासून मुक्त करण्यासाठी आहे...मात्र, ही योजना महाराष्ट्रात नाही, बिहारमध्ये आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत भिकाऱ्याला 10 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा सत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT