saam tv
व्हायरल न्यूज

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

Raise Donkeys and Become Rich: आम्ही व्हायरल व्हिडिओ, मेसेजची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की गाढवं पाळा आणि तरुण व्हा, श्रीमंत व्हा, पण, असं गाढवामध्ये काय आहे? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • गाढवं पाळा आणि श्रीमंत व्हा असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल.

  • गाढवाच्या दुधाचे आणि कातडीपासून बनणाऱ्या औषधांचे चमत्कारी फायदे असल्याचा दावा.

  • काही पोषक घटक असले तरी चमत्कारी परिणामांचे वैज्ञानिक पुरावे मर्यादित.

गाढवं पाळा आणि श्रीमंत व्हा, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. गाढवाचं दूध हे अत्यंत गुणकारी असून, गाढवाच्या कातडीपासून बनवलेल्या औषधांमुळे वयोवृद्धही तरुण दिसू शकतात असा दावा करण्यात आलाय, पण, खरंच गाढवाचं दूध, त्याच्या कातडीपासून बनवलेली औषधं खरंच गुणकारी आहेत का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

गाढवांच्या कातड्यांमधून जिलेटिन तासनतास उकळून काढलं जातं. त्यापासून पावडर, टॅब्लेट, औषध बनवलं जातं. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, प्रजनन क्षमता वाढवते आणि वृद्धत्व रोखते. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना याचीच उत्सुकता आहे की हे औषध कुठे मिळतं. खरंच गाढवाच्या कातडीपासून बनवलेलं औषध गुणकारी आहेत का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.त्यावेळी याचा वापर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं.

याची अधिक माहिती मिळवली त्यावेळी चीनला दरवर्षी 50 लाख गाढवं लागत असल्याचं समोर आलं. पाकिस्तान, आफ्रिकेतून चीन मोठ्या प्रमाणात गाढवं आयात करतो. पण, गाढवाच्या कातडीपासून खरंच चीन चमत्कारीक औषध बनवतं का? त्याबद्दल आम्ही अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

चीन गाढवाच्या कातडीपासून औषध तयार करतं

चीनी संस्कृतीत सुपरफूड चमत्कारिक औषध मानलं जातं

आधी हे औषध राजघराण्यांपुरते मर्यादित होतं

आता चीनच्या मध्यमवर्गीयांमध्ये औषधाची मागणी

औषधामुळे रक्ताभिसरण सुधारते, वृद्धत्व रोखतं

चीनमध्येच नव्हे तर भारतातही गाढवांची संख्या कमी होतेय. यांत्रिकीकरणामुळे गाढवांच्या प्रजननात घट झालीय. गाढवाच्या कातडीपासून बनवलेले हे औषध इतके महागडे विकलं जातं की त्याला काळं सोनं असेही म्हटलं जातं.म्हणूनच गाढव चीनच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग ठरतोय...त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT