Saam Tv Fact Check: 
व्हायरल न्यूज

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Saam Tv Fact Check: गणपती सारखा दिसणारा मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची...गणपतीसारखा दिसणाऱ्या बाळाचा जन्म झाल्याचा दावा करून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय.व्हिडिओत हुबेहुब गणपती दिसतोय.त्यामुळे खरंच गणपतीसारखं बाळ जन्माला आलंय का? हा व्हिडिओ नक्की कुठला आहे.? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

गणपतीसारखंच बाळ जन्माला आल्याचा दावा करून हा व्हिडिओ व्हायरल होतोय...हा व्हिडिओ पाहिला तर हुबेहुब गणपतीच दिसतोय. हात, सोंड, कान अगदी सगळं गणपतीसारखंच दिसतंय. देशभरात गणपतीचे लाखो भक्त आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे...? गणपतीसारखं बाळ जन्माला आलंय का.? याची आम्ही पडताळणी सुरू केली...मात्र, त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात

व्हायरल मेसेज

राजस्थानमध्ये एका गावात बाळ जन्माला आलंय ते गणपती सारखंच दिसतंय. या बाळाच्या चेहऱ्यावर गणपतीसारखी सोंड आहे आणि मोठे कान आहेत.लोक या बाळाला देवाचा अवतार मानून दर्शन घेतायत.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. गणपतीवर अनेकांची श्रद्धा आहे. लाखो गणेश भक्तांच्या हा श्रद्धेचा विषय असल्याने आम्ही हा व्हिडिओ राजस्थानचा आहे का? खरंच गणपती सारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म झालाय का.? हे आम्ही पडताळून पाहिलं.त्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने रिसर्च सुरू केलाय. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात

साम इन्व्हिस्टिगेशन

व्हिडिओत दिसणारा सोंडवाला मुलगा खरा नाही

व्हिडिओ AI च्या माध्यमातून बनवण्यात आलाय

हा व्हिडिओ @aliaboutine नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मिळाला

मोरक्कोत राहणारा अली डिजिटल क्रिएटर आणि आर्टीफीशियल इंटेलिजेंस आर्टिस्ट आहे

अलीच्या युट्यूब चॅनेलवर आम्हाला व्हायरल व्हिडिओ सापडला

8 सप्टेंबर रोजी हा गणपतीचा व्हिडिओ शेअर केला

हा व्हिडिओ डिजिटल टूल्सच्या मदतीने बनवण्यात आलाय...गणपती उत्सवामुळे हा व्हिडिओ गणेश भक्तांच्या नावाने व्हायरल करून लोकांची दिशाभूल करण्यात आली...मात्र, राजस्थानमध्ये गणपतीसारखं दिसणारं बाळ जन्माला आलेलं नसून, व्हिडिओतील गणपती आर्टीफीशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून बनवल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलंय...त्यामुळे अशा व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

Salim Khan: सलमान खानचे वडिल सलीम खान यांच्यावर केली डीएसए प्रक्रिया; नक्की काय आहे ही प्रोसेस आणि का करतात?

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

SCROLL FOR NEXT