Groom Ex-Girlfriend Viral Video  Viral Video
व्हायरल न्यूज

Viral Video: गुलिगत धोका दिलास! एक्स गर्लफ्रेंडने लग्नात राडा घातला, नवरोबाला स्टेजवरच दिला चोप, नवरी पाहातच राहिली

Groom Ex Girlfriend Viral Video: नवरदेवाच्या एक्स-गर्लफ्रेंड स्टेजवर जाऊन राडा घातला. तिने नवरदेवाला चांगलाच चोप दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

Groom Ex Girlfriend Viral Video News : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. पण काही लोकं या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात आणि नको नको त्या गोष्टी करून बसतात. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या तरुणीच्या प्रियकराचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत होत होतं. अक्षदाही पडल्या. नवरीने नवऱ्याला हार घातला, नवरदेव नवरीला हार घालणार, तेवढ्यात एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आली. त्यानंतर जे झालं ते लग्नमंडपात हजर असणाऱ्यांसाठी धक्कादायकच होतं. म्हणे तिला प्रेमात धोका मिळाला. त्यामुळे नाराज आणि संतापलेल्या एक्स गर्लफ्रेंडने लग्नातच राडा घातला. नवरदेवाला चापटा मारल्या. या प्रसंगाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल..

लग्नावेळी नेमकं झालं काय?

झालं असं की, लग्नाच्या वेळी नवरेदवाची एक्स गर्लफ्रेंड अचानक मंडपात पोहचली. तिला आमंत्रण नसतानाही ती आली होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असे दिसतेय की, वधू वराच्या गळ्यात हार घालते. त्यानंतर नवरदेव वधूच्या गळ्यात हार घालणार तोच एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर पोहोचते. यानंतर स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. एक्स गर्लफ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतले. एक्स गर्लफ्रेंडने इतके जोरात मारले की नवरदेव स्टेजवरच पडला. हे सगळे घडत असताना नवरी पाहतच राहिली. तिला नेमकं काय घडतेय हे काही क्षण समजलेच नाही.

एक्स गर्लफ्रेंडने मारल्यानंतर नवरदेव स्टेजवर पडला होता. त्यानंतरही तिचा राग शांत झाला नाही, ती त्याला मारहाण करायचे सोडत नाही. काही लोकांनी दिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबायचं नाव घेत नव्हते. हा सगळा प्रकार पाहून लग्नातील वराती थक्क झाले. काही महिलांनी स्टेजवर धाव घेत त्या मुलीसोबत बोलून प्रकरण शांत केलं. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत असून 3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ.....

sonukumargiri396 या इन्स्टाग्रामच्या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'या भीतीपोटी मी लग्न करत नाहीये.' असे लिहिलेय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू अनावर झाल्याचे कमेंट्समधून दिसत आहे.

comments on Viral Video

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT