Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरा असावा तर असा! बायकोला बिकीनी घालून बिचवर फिरायचं होतं, पठ्ठ्याने आयलँडचं विकत घेतला, किंमत वाचून चकीत व्हाल

Trending Video: सोशल मीडियावर दुबईतील एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे त्याने चक्क पत्नीसाठी एक बेट खरेदी केलेले आहे. मात्र जेव्हा याचे कारण अतिशय अनोखे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वात अनोखे नाते हे नवरा अन् बायकोचे मानले जाते. जगभरात या नात्याविषयी विविध गोष्टी बोल्या जातात शिवाय सोशल मीडियावर या घटनांतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू येतात तर कधी धक्का बसतो. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दुबईतील पती-पत्नीच्या एका गोष्टीची मोठी चर्चा होत आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बिकनी घालता यावी म्हणून अख्खे आयलँड विकत घेतले आहे. या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आलेला आहे.

इन्स्टाग्रामवर(Instagram) व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा(Discussion) सुरु झाली. मग काय जगभरात या पतीबद्दल कौतुक केलं जात आहे. जिथे त्याने पत्नीला बिकनी घालण्याची इच्छा होती मात्र सर्वत्र असुरक्षित वातावरण असल्याने त्याने बायकोच्या प्रेमाखातर तब्बल 374 कोटी रुपये खर्च करुन एक बेट(Island) खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओतमध्ये दिसते की, सुरुवातीस व्हायरल होत असलेले नवरा-बायको दिसत आहे. त्यानंतर दोघेही एका विमानात बसून एका ठिकाणी जाताना दिसत आहेत. मात्र काही वेळात व्हिडिओच्या शेवटी एक विस्तृत बेट दिसून येत आहे. ज्या ठिकाणी सुंदर निसर्गाचा नजारा दिसून येतोय. या ठिकाणी एकही व्यक्ती दिसून येत नाही. मात्र व्हायरल होत असलेले व्यक्ती दुबईमधील बिजनेसमॅन असल्याचे समजते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील ''@soudiofarabia'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम गुंतवणूक आहे'' असे लिहिण्यात आलेले आहे. सात दिवसांपूर्वी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओला तब्बल हजारोहून अधिक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर अनेकांनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने प्रतिक्रिया बॉक्समध्ये लिहिले आहे,''मस्तच'' तर अनेकांनीही अशाच प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे निंबाळकर थोडक्यात वेळात गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी दाखल होणार

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

Akola By-poll: अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT