Nashik Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Nashik Video: दारुच्या नशेत तरुणीचा १५ मिनिटं रस्त्यावर राडा; अश्लील शिव्या अन् पोलिसाला मारहाण

Viral Video Nashik: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. घडलेल्या या घटनेत एका तरुणीने रात्रीच्या सुमारास भररस्त्यात राडा घातला आहे. ही घटना व्हायरल होताच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Tanvi Pol

Nashik News: नाशिकच्या मुंबई नाका परिसरात रात्री ११ च्या सुमारास एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणीने भररस्त्यात अश्लील भाषा आणि पोलिसांना शिवीगाळ करत धिंगाणा घातला. तिच्या गोंधळामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तरुणीने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जात असून सर्व घटनेचा व्हिडीओ नागरिकांनी चित्रीत करून व्हायरल केला आहे

त्या रात्री नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याच्या मध्यभागी बसलेली दिसते आणि ती पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट दिसतं. या अवस्थेत तरुणी आजूबाजूच्या नागरिकांशी अर्वाच्य भाषेत बोलताना आढळते. तिच्या अशा वर्तनामुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं.

हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''नाशकात भररस्त्यात, मद्यधुंद तरुणीला राडा'' असे लिहिले आहे. काही तासांतच हा व्हिडिओ राज्यभरात पाहिला गेला आणि त्यावर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओ(Video) शिवाय साक्षीदारांच्या अहवालावरून संबंधित तरुणीवर सार्वजनिक शांतता भंग, पोलिसांशी असभ्य वर्तन आणि मद्यपानासंबंधित गुन्ह्यांनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. शिवाय व्हिडिओ पाहताच नागरिकांनीही अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT