Drunk Man Driving Car Video Saam TV
व्हायरल न्यूज

Drunk Man Driving Car Video: दारुच्या नशेत चालवत होता कार; रेल्वे ट्रॅकवर पोहचताच लागली गाढ झोप अन्..., थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

Drunk Man Driving Car On Railway Track: रेल्वे प्रवास करताना देखील थोड्याशा चुकीमुळे जागेवर अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

Ruchika Jadhav

Viral Video: वाहन चालकाने वाहतुकीचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. हे नियम न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. रेल्वे प्रवास करताना देखील थोड्याशा चुकीमुळे जागेवर अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशात सोशल मीडियावर एका व्यक्तीचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा तरुण आपल्या कारने एका ठिकाणी जात आहे. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत दिसतोय. अशा अवस्थेत या व्यक्तीने कार चालवली आहे. कार चालवत तो थेट रेल्वे रुळांवर म्हणजे रेल्वे फाटकावर पोहचला. इथे आल्यावर हा व्यक्ती इतका नशेत होता की, त्याला कार व्यवस्थित चालवता येत नव्हती.

रेल्वे रुळांवर झोपला

कार चालवत हा व्यक्ती १५ मीटरपर्यंत पुढे आला होता. अशात पुढे जाण्याचा प्रयत्न करता करता त्याला डुलकी लागली. नशिबाने यावेळी तेथील रेल्वे रुळांवरुन कोणतीही ट्रेन येत नव्हती. त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.

परिसरात असलेल्या नागरिकांनी ही कार पाहिली होती. बराचवेळ झाला कार रेल्वे रुळांव आहे हे पाहून काही स्थानिक नागरिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली. कारमध्ये त्यांनी पाहिले की, एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत कार चालवत आहे. त्यांनी या व्यक्तीला रेल्वे रुळांवरुन बाहेर काढण्यास मदत केली.

सदर व्हिडिओ केरळमधील आहे. केरळ रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यत घेतलं असून या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक रेल्वे रुळांवर पोहचले त्यावेळी त्यांनी या व्यक्तीचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT