व्हायरल न्यूज

Dombivali Video: किळसवाणा प्रकार! तुम्ही खात असलेल्या फळांवर लघुशंका? लघुशंका करुन त्याच हाताने फळविक्री

Dombivali Fruit Saller : डोंबिवली येथील एका फाळांच्या व्रिकेत्याने एका प्लास्टिक पिशवीत त्याने लघुशंका केली हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Girish Nikam

आता डोंबिवलीतून धक्कादायक बातमी. ही बातमी पाहिल्यावर तुम्ही रस्त्यावरील विक्रेत्यांकडून फळे किंवा खाण्याचे पदार्थ घेणे नक्कीच टाळाल...एक फळ विक्रेता प्लास्टिकच्या पिशवित लघुशंका करून त्याच हाताने फळांची ग्राहकांना विक्री करतोय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनीही कारवाई केलीये. पाहूया एक रिपोर्ट..

हातगाडीवरचे पदार्थ खाऊ नका, उघड्यावरचे अन्न पदार्थ आरोग्याला अपायकारक असतात अशी सुचना नेहमी केली जाते. कारण नागरिकांच्या आरोग्य़ाचा प्रश्न आहे. हे पदार्थ विकणा-यांचे संतापजनक कारनामेही अधुनमधून समोर येत असतात. किळसवाणं कृत्य करणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्यांच्या घटना ताज्या असतानाच एका फळविक्रेत्याचं संतापजनक कृत्य समोर आलंय. ही बातमी पाहिल्यावर तुम्ही रस्त्यावरील विक्रेत्यांकडून फळे किंवा खाण्याचे पदार्थ घेताना नक्कीच विचार कराल. आम्ही दाखवतोय तो व्हिडीओ नीट पाहा. हा फळविक्रेता त्याच्या हातगाडीवरील पिशवीत लघुशंका करत आहे.

डोंबिवलीच्या निळजे परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. हा फळ विक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका करून त्याच हाताने फळांची ग्राहकांना विक्री करतोय. गंभीर बाब म्हणजे त्याच्या हातगाडीवरच हा किळसवाणा प्रकार करतोय. डोंबिवली निळजे परिसरातला हा व्हिडियो व्हायरल झाला. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपास करुन या विक्रेत्याला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

असं घाणेरडे कृत्य करणारे विक्रेते निर्लज्यपणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असतात. त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे आहे. नागरिकांनीही भाजीपाला किंवा फळ खरेदी करताना सतर्क राहावं. स्वच्छ जागा, खात्रीशीर व्यक्ती आदी गोष्टी पाहूनच खरेदी करावी. कारण सवाल कुटुंबाच्या आरोग्याचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यू

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Ganpati Bappa 2025: उजवी की डावी? शास्त्रानुसार कोणत्या सोंडेचा गणपती बाप्पा घरी बसवणं असतं शुभ?

Today Gold Rate : गणेशोत्सवापूर्वी सोनं-चांदी महागली, सोन्याचे दर १००० तर चांदी २५०० रुपयांनी वाढले, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT