Viral Video Saam Tv News
व्हायरल न्यूज

Viral Video: वॉक करणाऱ्या महिलेवर कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवण्यासाठी २० फुटांवरून मारली उडी; थरारक व्हिडीओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने स्वत:चा जीव वातवण्यासाठी जे केलं ते पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे.

Tanvi Pol

Greater Noida News: नियमित वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेला अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. शांतपणे चालत असताना एका पाळीव कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी या महिलेला जवळपास २० फूट उंचीवरून खाली उडी मारावी लागली आहे. या सर्व थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जीव वाचवण्यासाठी उडी

व्हायरल (Viral) होत असलेल्या घटनेत तुम्ही पाहू शकता, एक महिला एका पाळीव कुत्र्याला घेऊन सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरवत असते. जर पाहिले तर हे गार्डन रस्त्यावरुन काही मजले उंच आहे. दरम्यान तिथे त्याच वेळी एक महिला मॉर्निग वॉक करण्यासाठी येत असते. त्याच वेळी तो कुत्रा त्या महिलेवर हल्ला करण्यासाठी धावून जातो. पण महिलेले काही सुचताच तीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तब्बल २० फुटावरुन खाली उडी मारते.

सुदैवाने महिलेने खाली उडी मारलेल्या खड्ड्यात झाडझुडूपं आणि मऊ माती होती, त्यामुळे ती थोडक्यात बचावली. मात्र, या उडीमुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

ही संपूर्ण घटना जवळच्या इमारतीच्या सीसीटीव्ही(CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि तो व्हिडिओ एक्स अर्थात ट्वीटरवरील @GreaterNoidaW या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर नेटकरी वर्गातून संतापजनक तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT