Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आजोबा जोमात वऱ्हाडी कोमात, काठी न घोंगड गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO

Old Man Dance Video Goes Viral: सोशल मीडियावर कायम धक्कादायक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात बरेच व्हिडिओ डान्सचे असतात. कधी लग्नातील वरातीमधील तर कधी शाळेतील डान्स प्रोग्रामचे असतात. त्यात लहान मुलांच्या डान्स स्टेप्स प्रत्येक नेटकरी वर्गाचे मन जिंकून घेतात तर कधी मित्रांच्या वरातीत धिंगाना घातलेल्या मित्रांचे डान्स व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,त्यात एका आजोबांनी लग्नाच्या वरातीत फुल टू धम्माकेदार डान्स केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, व्हिडिओत संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळीनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत मात्र काही वेळात यांनी एका आजोबांना खांद्यावर उचलून घेतात आणि डान्स करण्यास सुरुवात करतात.

आजोबा (grandfather)आणि संपूर्ण मंडळी 'काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की' या मराठी गाण्यावर डान्स करत आहेत.मात्र या वयातही आजोबांचा डान्स करण्याचा उत्साह तरुणाईला फेल करतील असा आहे. आजोबांनी सफेद रंगांचे कपडे परिधान केलेले आहेत शिवाय डोक्यावर गांधी टोपी घातलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्रामवरील' '@abhay_kalsule_photography' या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ नेटकरी वर्गापर्यंत पोहचताच नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच 'आजोबा जोमात वराड कोमात'असे कॅप्शन दिले आहे.कॅप्शन आणि व्हिडिओ पाहून नेटकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' व्हा रे बाबा'तर अनेकांनी गंमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT