Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: प्रसाद खरेदीला नकार, भाविकाला मारहाण; व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संताप

Viral Video: लखनऊच्या चंद्रिका देवी मंदिरातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, बीकेटी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. घटना चर्चेत आहे.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील प्रसिद्ध चंद्रिका देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविक आणि दुकानदारांमध्ये मोठा वाद झाला. प्रसाद घेण्यास नकार दिल्यामुळे काही दुकानदारांनी एका भाविक महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मारहाण झालेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून, बीकेटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. धार्मिक स्थळी घडलेली ही घटना चिंतेची बाब मानली जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अलीगंज पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या त्रिवेणी नगर, ६० फिट रोड येथील रहिवासी पियुष शर्मा आपल्या कुटुंबासह माँ चंद्रिका देवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर प्रसाद घेण्यासाठी पियुष दुकानांच्या दिशेने गेला असता, तेथील काही दुकानदारांनी आपापल्या दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्यावर जोर आणायला सुरुवात केली.

सततच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या पियुषने सामान घेण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र त्याच्या या नकारामुळे वाद उद्भवला आणि पाहता पाहता वादाने हिंसक वळण घेतले. दुकानदार आणि पियुष यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. मंदिर परिसरातील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंदिर परिसरात काही लोकांमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे, ज्यात महिलाही सहभागी आहेत. काहीजण बेल्टसह एकमेकांवर तावातावाने धावून जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. पीडिताने दिलेल्या तक्रारीनंतर बीकेटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुकानदारांनी जबरदस्तीने प्रसाद खरेदीसाठी दबाव टाकल्यामुळे वाद निर्माण झाला. नकार दिल्यावर वाद वाढून मारहाणीपर्यंत गेला. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT