Stunt On Road Delhi Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Viral Video: रिल्ससाठी स्टंटबाजी! भररस्त्यात गाडी आडवी लावली, वाहनांच्या रांगा लागल्या अन्.. संतापजनक VIDEO

Stunt On Road Delhi Viral Video: धावत्या बाईकवर, मेट्रो, ट्रेन, बसच्या गर्दीत, भररस्त्यात कुठेही रिल्स शूट केल्याचे प्रकार समोर येत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हे तरुण- तरुणी काय करतील याचा नेम नाही. सध्या दिल्लीमधील एक असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Delhi Stunt Viral Video:

सध्याच्या तरुणाईला रिल्सचे लागलेले वेड भयंकर आहे. धावत्या बाईकवर, मेट्रो, ट्रेन, बसच्या गर्दीत, भररस्त्यात कुठेही रिल्स शूट केल्याचे प्रकार समोर येत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हे तरुण- तरुणी काय करतील याचा नेम नाही. सध्या दिल्लीमधील एक असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणांचा प्रताप पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

सोशल मीडियावरील (Social Media) रिल्स स्टार फेमस होण्यासाठी नेहमी हटके कंटेट तयार करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र अनेकदा त्यांच्या या कंटेटमुळे सामान्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोमध्ये, भररस्त्यात अश्लिल डान्स करत जीवघेणे स्टंट करत लक्ष वेधल्याचे प्रकार अनेकदा समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) काही तरुणांनी रिल शूट करण्यासाठी भररस्त्यात गाडी आडवी लावत हुल्लडबाजी केल्याचे दिसत आहे. तरुणांच्या या प्रतापामुळे रस्त्यावरील इतर वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ (Delhi) दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण रस्त्याच्या मधोमध धावती कार थांबवून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करत आहेत. तरुणांच्या या प्रतापामुळे रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी झाल्याने इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

धक्कादायक म्हणजे याच तरुणांनी एका पुलावरही अशीच धोकादायक पद्धतीने गाडी पळवल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे. तरुणांच्या या पोस्टला आतापर्यंत 100k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT