Delhi Metro Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: आवरा कोणीतरी! प्रवाशांनी भरलेली मेट्रो अन् तरुणीने सुरू केला भलताच स्टंट... लोकही चक्रावले; VIDEO

Girl Stunts inside Metro: नेटकऱ्यांनी तरुणीच्या कृतीवरुन खडेबोल सुनावले आहेत. तर काही जणांनी तिच्या या स्टंटबाजीचे कौतुकही केले आहे.

Gangappa Pujari

Girl Stunt In Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो सध्या विविध कारणांनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. कधी मुलांच्या स्कर्ट घालून एन्ट्रीने तर कधी कपलच्या रोमान्सने दिल्ली मेट्रो वादात सापडली होती. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर चांगलाच संताप व्यक्त केला होता.

परंतु दिल्ली मेट्रोमधील हे व्हायरल प्रकरण काही थांबत नाहीये, सोशल मीडियावर मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रवाशासमोरच तरुणीने स्टंटबाजी केल्याचे दिसत आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घेवू सविस्तर.

काय आहे व्हिडिओ..

सध्या सोशल मीडियावर (Social Media) फेमस होण्यासाठी तरुण तरुणी अनेक प्रताप करत असतात. कधी गाडीवर बसून स्टंटबाजी तर कधी भररस्त्यात डान्स करुन सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रो सर्वात आघाडीवर आहे. दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्याची नेटकऱ्यांमध्ये तुफान जोरदार चर्चा होत असते.

तरुणीची स्टंटबाजी....

सध्या अशाच एका तरुणीच्या स्टंटबाजीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रवाशांच्या गर्दीत एक तरुणी वेगवेगळे स्टं करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तरुणीचा हा प्रताप पाहून बाकीचे प्रवासी चांगलेच चक्रावून गेले आहेत. या तरुणीने स्टंटबाजी सुरु केल्यानंतर तिने मारलेली फ्लिप (हात टेकवून उभ्यानेच मारलेली कोलांटी उडी) पाहून मेट्रोमधील अनेकजण नजरा रोखून आश्चर्यचकित होत तिच्याकडे पाहू लागले.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

मिशा शर्मा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी तरुणीच्या कृतीवरुन खडेबोल सुनावले आहेत. तर काही जणांनी तिच्या या स्टंटबाजीचे कौतुकही केले आहे. काही नेटकऱ्यांनी या तरुणीवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT