Delhi Metro Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video: गर्दीत मोबाईलवर हात साफ करायला गेला; रंगेहात पकडलं अन् धो धो धुतलं

Fighting In Delhi Metro: सोशल मीडियावर एक मेट्रोतील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे दिल्ली मेट्रोतील आहे. कोणत्या कारणांमुळे ही चर्चेत आलेली आहे ते पाहा.

Tanvi Pol

Mobile Snatching Video: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मेट्रोमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. गर्दीच्या वेळी तर या मेट्रोमध्ये एक पाऊल टाकायलाही जागा उरत नाही. अशा परिस्थितीत काही लोक आपल्या स्वभावानुसार चुकीचे मार्ग स्वीकारतात. सध्या असाच एक प्रकार दिल्ली मेट्रोमध्ये घडलेला आहे. एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाचा मोबाईल चोरायचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडले आणि त्याची चांगलीच अद्दल घडवली

गर्दीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न

व्हायरल (Viral) होत असलेली घटना दिल्ली मेट्रोतील आहे. जिथे तुम्हाला प्रवाशांमधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असेल. पण नंतर व्हिडिओत दिसते की, काही प्रवाशी एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. काही प्रवाशी या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये कैद करत आहेत तर काहीजण तापलेलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्नात आहेत. घडलेल्या या घटनेचे कारण म्हणजे, ज्या तरुणाला मारहाण होत आहे, त्याने गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न केला होता.

ही घटना काही तासांतच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेली आहे आणि सध्या हा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवरील news24official या अकाउंटवर पोस्ट केला आहे. घटना कधीची आहे हे अद्याप समजले नाही. मात्र, सोशल मीडियावर यापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या अशा अनेक घटनांचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतात.

सोशल मीडियावर संताप

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर मेट्रो स्थानकाच्या सुरक्षारक्षकांनी त्या तरुणाला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पण नागरिकांकडून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. काही यूजर्संनी म्हटलं की,''आता माणुसाचे सामान कुठेच सुरक्षित नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''प्रवाशांनी बरोबर केलं'' शिवाय काहींनी म्हटलं की,''नेहमीच झालं आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: मेट्रोतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT