Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ऑटोवर चढून शर्ट काढला आणि सुरू केली स्टंटबाजी; तरुणांचा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप अनावर

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Noida viral stunt: नोएडामधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्या व्हिडिओमध्ये दोन तरुण ऑटो रिक्षावर चढून धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. या प्रकारामुळे इतर वाहन चालकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भररस्त्यात जीवघेणा स्टंट

व्हायरल(Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुण ऑटो रिक्षावर चढले आहेत. एक तरुण रिक्षावर बसलेला आहे तर दुसरा रिक्षाच्या दरवाजाला लटकला आहे. धक्कादायक म्हणजे दोघही शर्ट काढून रिक्षावर स्टंट करत असतात. भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटो रिक्षामधून दोघांची तोल गेला असता तर भयानक अपघातही झाला असता. सर्व धक्कादायक प्रकार त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाहनचालकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सोशल मीडियावर तरुणाईचे अनेक जीवघेणे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सर्व स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले जातात. मात्र, या सर्वांमुळे तरुणाई स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालते. सध्या हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @News1IndiaTweet या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर संताप आणि कारवाईची मागणी

व्हिडिओ (Video) व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''हे काही सुधारणार नाहीत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''तरुणाईला कशाचेही भान राहिले नाही'' तर प्रत्येक यूजर्संनी संतापजनकही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT