Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वडिलांनी दिलेले सरप्राइज पाहून चिमुकल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिलात का?

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ पाहून अक्षरशा: आपण भावूक होतो तर कधी पोट धरुन हसतो. असातच एका चिमुकल्याचा व्हिडिओ(Video)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आवडते गिफ्ट( Gift) भेटल्यानंतर वडिलांना घट्ट मिठी मारून चिमुकला रडला आहे. सध्या सर्वत्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक घरातील आतील बाजू दिसत आहे, ज्यात एका खोलीत एक वडील त्याच्या मुलाला घेऊन येतात. मात्र चिमुकल्याच्या डोळ्याला वडिलांनी रुमाल बांधलेला आहे. काही वेळात वडिलांनी त्या खोली असलेल्या एका वस्तूवर चादर झाकलेली असते मात्र चिमुकल्याला ती चादर हटवण्यास सांगतात.

त्यानंतर त्या चादरी खाली मुलाच्या पसंतीची सायकल असते जी त्यांनी मुलाला सरप्राइज दिलेली असते. मुलगा सायकल पाहून एवढा खूष होतो की थेट वडिलांना घट्ट मिठी मारतो.मात्र त्यानंतर चिमुकला खूप रडण्यास सुरुवात करतो. वडिलांनी रडत त्याला सायकलवर बसवतात. वडिल-मुलांचा सुंदर क्षण घरातील एका सदस्याने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी पोस्ट होताच आतापर्यंत व्हिडिओला ८ हजार लोकांनी पसंती दिलेली आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' सुंदर व्हिडिओ'' तर अनेक यूजर्संनी हृार्टचे इमोजीस कमेट्सबॉक्समध्ये दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT