Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्युट रिअ‍ॅक्शन! डान्स करताना मम्मी-पप्पाना पाहिलं अन् आनंदाने भारावली चिमुकली

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात ती डान्स करत असताना तिच्या पालकांना पाहून गोड लाजते.व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्हीही एकदा पहा.

Tanvi Pol

Little Girl Viral Video: शाळेतील गॅदरिंगचा दिवस प्रत्येकाच्या आठवणीताल खास क्षण असतो.गॅदरिंगचा कार्यक्रमाची तयारी करण्यापासून ते कोणत्या गाण्यावर डान्स करण्याचा पासून ते संपूर्ण गॅदरिंग होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात दिसून येतात.मग या सर्व गोष्टींमध्ये लहान चिमुकल्यांचे गोड क्षण कॅमेऱ्यात कैद होतात.सध्या सोशल मीडियावर असात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात शाळेतील गॅदरिंगमध्ये डान्स सादर करत असताना तिने आपल्या पालकांना पाहून लाजलेली आहे.चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर बऱ्याचदा लहान चिमुकल्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral) होत असतात.व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचे भन्नाट डान्स असतात जे पाहून प्रत्येकजण हैराण होतो.तर कधी चिमुकल्यांच्या करामतीचे व्हिडिओ असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या चिमुकलीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत,शाळेतील गॅदरिंग सुरु असलेले दिसत आहे.गॅदरिंगच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यी स्टेजवर उभे राहून डान्स करत असतात,मात्र त्यातील एक चिमुकली डान्सला सुरुवात करते,मात्र डान्स करत असताना चिमुकलीचे लक्ष तिचा डान्स पाहत असलेल्या तिच्या पालकांकडे जाते आणि ती गोंडस हसते.सर्व व्हिडिओ तिच्या पालकांच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे.सर्व गोंडस व्हिडिओ इन्स्टाग्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या 'storiesbytwoplusone'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

चिमुकलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलाय.नेटकऱ्यांनी व्हिडिओला फक्त पसंतील दिलेली नाही तर विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.कमेटबॉक्समध्ये एका यूजरने लिहिले आहे,''ती किती गोंडस आहे''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''अनेकवेळा व्हिडिओ(Viral) पाहिला तरी असे वाटते पुन्हा पुन्हा पाहावा'' शिवाय अनेक यूजर्संनी लिहिले आहे,''तिच्या चेहऱ्यावरील आनंद तरी पहा'' तर काही यूजर्संनी,''खूप गोंडस मुलगी''अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

SCROLL FOR NEXT