Crab Bite Tongue Video Saam TV
व्हायरल न्यूज

Crab Bite Tongue Video: चांगलीच मस्ती जिरली! खेकड्याने तरुणाच्या जीभेचा घेतला कडकडून चावा; थरारक VIDEO एकदा पाहाच

Crab Bite Viral Video: आपल्याला प्रसिद्धी मिळावी आणि आपण सोशल मीडिया स्टार व्हाव यासाठी तरुण जिवाची पर्वा न करता खतरनाक स्टंटबाजी करतात.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर व्हायरल आणि फेमस होण्यासाठी आजची तरुणाई काय करेल आणि काय नाही याचा काही नेम नाही. आपल्याला प्रसिद्धी मिळावी आणि आपण सोशल मीडिया स्टार व्हाव यासाठी तरुण जिवाची पर्वा न करता खतरनाक स्टंटबाजी करतात. आता असं करताना अनेकदा त्यांच्या जीवावरही बेतत. तर काही व्हिडीओमध्ये त्यांची मोठी फजीती झालेली दिसते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये एका तरुणाने केलेली मस्ती त्याच्या चांगलीच अंगाशी आलीये. तरुणाने एक खेकडा हातात पकडलाय. खेकड्याशी खेळ करताना त्याच्या नांग्यांपासून सावध रहावं लागतं. नांग्यांमध्ये हात सापडला तर खेकडा कडकडून चावा घेतो. आता खेकड्यासोबत एका तरुणाने स्टंटबाजी केलीये.

तरुणाने केलेल्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या तरुणाने एका हातात खेकडा पकडलाय. खेकड्याला पकडल्यावर आपल्या बचावासाठी तो नांग्यांचा वापर करतो. तरुणाने आपली जीभ खेकड्याच्या नांग्यांजवळ नेलीये. आपल्या जिभेला खेकडा चावण्याआधीच मी स्वत:चा बचाव करणार हे दाखवण्याचा प्रयत्न तरुण करत आहे. मात्र त्याची ही स्टंटबाजी फसते आणि खेकडा तरुणाच्या जिभेचा चावा घेतो.

@kiran_zare_ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ऑगस्ट महिन्यात हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओवर लाखो व्ह्यूव्ज मिळालेत. तरुणाच्या जिभेला खेकडा चावल्यावर त्याला वाचवण्यासाठी दुसरा एक व्यक्ती मदत करतो आणि खेकड्याला बाजूला करतो. तरुणाची झालेली फजीती पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी पाठवलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

SCROLL FOR NEXT