coldplay saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई लोकलमध्ये Coldplayचं कॉन्सर्ट! फॅन्सचा VIDEO तुफान व्हायरल

Coldplay Concert In Mumbai Local: भारतात सध्या कोल्डप्लेच थरार सुरु आहे. दरम्यान मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Saam TV News

भारतात सध्या कोल्डप्लेची जोरदार चर्चा सुरु आहे. ब्रिटीश बँड ग्रुप कोल्डप्ले सध्या भारत दौऱ्यावर आहे. आधी मुंबईत आणि अहमदाबादमध्ये कोल्डप्लेचा शो पार पडला. मुंबईत झालेल्या कॉन्सर्टला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. केवळ कॉन्सर्टमध्येच नव्हे, तर मुंबई लोकलमध्येही कोल्डप्लेची क्रेझ पाहायला मिळाली आहे. दरम्यान मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मुंबईमध्ये ३ दिवस कोल्डप्लेचा शो रंगला. हा शो पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. दरम्यान शो संपल्यानंतर जेव्हा मुंबईकर लाईफलाईन लोकलने घरी परतण्यासाठी निघाले तेव्हा लोकलमध्येही कोल्डप्लेचा क्रेझ पाहायला मिळाला. एका युझरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, व्हिडिओ शेअर करताच तुफान व्हायरल झाला.

मुंबई लोकलमध्ये कोल्डप्लेची जादू

अनेकदा आपण एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर, तिच गाणी गातो. त्यानंतर तिच गाणी पुन्हा पुन्हा ऐकतो. मुंबईतील कोल्डप्ले कॉन्सर्टनंतरही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असलेले प्रवासी जोरजोरात कोल्डप्लेची गाणी गाताना दिसून येत आहेत.

या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, चाहते मुंबई लोकल ट्रेनमध्ये कोल्डप्लेचं प्रसिद्ध गाणं हायमन फॉर दे विकेंड हे गाणं गाताना दिसून येत आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेट्ंसचा पाऊस पाडला जातोय. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Garib Rath Express : ब्रेकिंग न्यूज! गरीब रथ ट्रेनच्या ३ एसी बोगीला भयंकर आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT