Viral Video SaamTv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्लॅटफॉर्मवर तरुणीचा डान्स, काकांनी रोखताच वाद पेटला; पुढचं दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Viral Video News: सध्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. नक्की व्हिडिओत काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Young Girl Video: गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. कुठेही आणि केव्हाही लोक मोबाईल काढून रील्स शूट करायला सुरुवात करतात. मात्र काही वेळा हे रील्स बनवणे इतर प्रवाशांसाठी डोकेदुखीही ठरते. सध्या नुकताच एक प्रकार एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडला आहे, जिथे रील्स बनवणाऱ्या एका तरुणी आणि एका व्यक्तीमध्ये मोठा वाद झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एका रेल्वे(Railway) स्टेशनवर रेल्वे थांबली असता, एक तरुणी रेल्वेमधून उतरते आणि प्लॅटफॉर्मवर स्टायलिश पोझ देत डान्स रील्स शूट करत होती. मात्र तिच्या पाठी असलेला एक व्यक्ती अचानक तिला धक्का देतो. मग काय तरुणी आणि त्या व्यक्तीमध्ये जोरदार वाद होण्यास सुरुवात होते. काही वेळ भांडण सुरु असताना त्याच ट्रेनमधून एक महिला खाली उतरते आणि त्यांचे वाद मिटवते. तिच्यासोबत तिची मैत्रीण होती तिने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.

तरुणीसोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यातच तो व्हिडिओ एक्सवरील ''gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ काही क्षणात लाखों संख्येने पाहिला गेला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

हा व्हिडिओ(Video) व्हायरल होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''योग्य नाही असं वागणं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खोट भाडंण करताना वाटतं आहेत'' तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT