Chile Plane Crash X Twitter
व्हायरल न्यूज

Watch Video: टेक ऑफ करताच विमानाने घेतला पेट; ‘फायर फाइटर’ पायलटचा आगीत होरपळून मृत्यू

Chile Plane Crash : चिलीच्या मंत्रालयाने या घटनेत पायलटचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. स्पॅनियार्ड फर्नांडो सोलान्स रोबल्स हे राष्ट्रीय वनीकरण महामंडळ (CONAF) साठी काम करत होते.

Bharat Jadhav

Chile Plane Crash Video Firefighting Pilot Killed:

चिलीमध्ये एक दुखद घटना घडलीय. चिलीमध्ये पंगुइलेमो विमानतळाजवळ एक फायर फायटरच्या विमानाचा अपघात झालाय. अग्निशमन दलाचे विमानाने टेक ऑफ घेताच पेट घेतल्यानं पायलट स्पॅनियार्ड फर्नांडो सोलान्स रोबल्सचा मृत्यू झालाय. दुर्घटनाग्रस्त झालेले विमान अग्निशमन दलाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest News)

आगीत होरपळून पायलटचा मृत्यू झाला. फर्नांडो सोलान्स हे मध्य चिलीतील तालका येथील विमानतळाजवळ ड्युटीवर तैनात होते. एका ऑपरेशन जात होते, त्यावेळी त्यांच्या विमानाने पेट घेतला. टेक ऑफ घेताच त्यांच्या विमानाने पेट घेतला. त्यानंतर हे विमान क्रापलेजवळ कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. चिलीच्या मंत्रालयाने या घटनेत पायलटचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय.

स्पॅनियार्ड फर्नांडो सोलान्स रोबल्स हे राष्ट्रीय वनीकरण महामंडळ (CONAF) साठी काम करत होते. आयरेस टर्बो ट्रश विमान १५ जानेवारीला अग्निशमनच्या कामासाठी गेले होते. त्याच दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक नियंत्रण सुटले, त्यानंतर विमानाने पेट घेतला. विमानाचे नियंत्रण सुटताच काही प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केलीय. व्हिडिओ आपण पाहू शकतो, विमान प्रचंड वेगाने झेप घेताना दिसतंय. एका विजेच्या खांबाजवळून हवेत उडत असते. त्यावेळी विमान अनियंत्रित होते आणि पेट घेतल्याचं दिसते. त्यानंतर विमान महामार्गावर कोसळते. विमान क्रॅश झाल्यानंतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारमध्ये प्रवास करणारे ४ जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT