Viral Story Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Story: एकदम फिल्मी! अपहरणकर्त्याला बिलगून रडू लागला चिमुकला, आरोपीचे डोळेही पाणावले, व्हिडिओ व्हायरल

The little one started crying, the eyes of the accused also got teary, the video went viral: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात.त्यात सध्या अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज जगात असंख्य गुन्हे घडत असतात.कुठे हत्या तर कुठे अपहरण.या घडलेल्या गुन्ह्याचे तपास पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात. आजपर्यंत घडलेल्या गुन्हे कोणत्या हेतूने केलेले असतात,त्यांच्या संपूर्ण गोष्टी ऐकून अनेकदा आपणही आश्चर्यचकित होऊन जातो.मात्र सध्या या संबंधिक एक घटना समोर आली आहे.ज्यात एका चिमुकल्याच्या अपहरणाची गोष्ट आहे.मात्र सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

तर घटना अशी आहे की,राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे पोलिसांच्या टीमने साधारण १४ महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याची सुटका केली आहे.मात्र चिमुकल्या मुलाला आरोपीकडून सुटका करताना एक वेगळाच अनुभव आला.जेव्हा पोलिसांनी अपहरण कर्त्याकडून मुलाला परत घेऊन जात होते तेव्हा मुलाने चक्क अपहरणकर्त्याला मिठी मारली आणि रडू लागला. एवढेच नाही तर त्या आरोपीच्या डोळ्यातही अश्रू आले होते.सध्या याचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक चिमुकला मुलगा त्या अपहरणकर्त्याला आरोपीला मिठी मारुन जोरजोरात रडताना दिसत आहे.त्या आरोपीला जराही सोडायला मुलगा तयार नाही. मुलाला रडताना पाहून आरोपीच्या डोळ्यातूनही अश्रू आले.मात्र पोलिसांनी लहान मुलाला आरोपीकडून सोडवून त्याच्या आईकडे दिले.परंतू,चिमुकला शेवटपर्यंत रडतच होता.

काय घडल?

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्याने गेल्या वर्षी जयपूरमधील सांगानेर येथून या लहान मुलाचे अपहरण केले होते.तेव्हा चिमुकला अवघ्या ११ महिन्यांचा होता.मात्र ज्या दिवशी मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी चिमुकल्याच्या शोधासाठी अनेक राज्यात शोधकार्य केले.त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपीचा पाठलाग(chase) करुन त्याला जयपुरला आणले.सध्या अपहरणकर्ता पोलिसांच्या कोठडीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT