Delhi CCTV Footage Saam Tv
व्हायरल न्यूज

CCTV Footage: आईसह चिमुकल्यावर कुत्र्याचा अचानक हल्ला, पोटच्या गोळ्याच्या बचावासाठी आईची धावपळ; थरारक VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Viral Video Of Dog attack On 2 Year Old Child:

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील विश्वास नगर परिसरात एका कुत्र्याने दोन वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगळवारी दिल्लीत एका रस्त्यावरुन आई आपल्या दोन वर्षीय बाळाला घेऊन जात होती. तेव्हा अचानक एका पाळीव कुत्र्याने हल्ला केला आहे. त्याने या लहान मुलाचे पाय खेचण्याचा, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत, एक महिला आपल्या दोन वर्षीय बाळाला घेऊन जाताना दिसत आहे. त्यावेळी अचानक एक महिला तिच्या पाळीव कुत्र्याला जात घेऊन जात होती. त्यावेळी अचानक तिचा पाळीव कुत्रा लहान मुलाच्या अंगावर धावून जातो. यावेळी मुलाची आई कुत्र्याला हकलण्याचा, स्वतःचा आणि बाळाचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. मोठमोठ्याने ओरडते. आपल्या दोन वर्षीय मुलाला वाचवताना ती महिला अचानक खाली पडते. त्यानंतर पुन्हा कुत्रा त्या लहान बाळावर धावून जातो. यावेळी आजूबाजूचे लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.

एक व्यक्ती लहान मुलाला उचलून घेतो, कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर अजून दोन तीन कुत्रे तिथे जमा होताना दिसत आहे. ही महिला त्या ठिकाणाहून पळ काढते. त्यानंतर तो व्यक्ती घेऊन लहान बाळाला घेऊन बाजूच्या गेटच्या आत जातो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे लोकांना खूप जास्त त्रास होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत दोन ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळेच नागरिकांनी घराबाहेर पडावे की नाही अशा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT