Accident CCTV Footage: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: भयंकर! भरधाव कारने सायकलस्वार अन् दुचाकीला उडवले, २ ठार; | थरारक अपघाताचे CCTV फुटेज

Accident CCTV Footage: व्हिडिओमध्ये एका भरधाव कार चालकाने सायकलस्वार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे दिसत आहे. या दुर्दैवी अपघातात सायकलस्वार आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Viral Accident Video:

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो हेच या व्हिडिओमधून दिसत असते. सध्या अशाच एका भयंकर अपघाताच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

वाहन चालवताना वाहनचालकांकडून अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे भीषण अपघात होतात. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका भरधाव कार चालकाने सायकलस्वार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे दिसत आहे.

या दुर्दैवी अपघातात सायकलस्वार आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भयंकर आहे की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. हा व्हिडीओ लखनऊ मधील असल्याचे सांगण्यात येत असून अपघाताची संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन दुचाकीस्वार आणि सायकलस्वार जात आहेत. अशातच अचानक त्यांच्याविरुद्ध दिशेने एक भरधाव कार येते अन् दोघांनाही जोराची धडक देते. या कारचा वेग इतका प्रचंड असतो की दोघांचाही यामध्ये जागीच मृत्यू होतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या कार चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods To Avoid At Night: रात्री चुकूनही 'हे' ५ पदार्थ खाऊ नका, शरीरासाठी ठरू शकतात घातक

Maharashtra Live News Update:छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Beed : टॉवर कोसळला अन् डाव मोडला; चोरी करताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shampoo Free Hair Wash Tips: शॅम्पू विसरा, केस धुण्यासाठी घरगुती या 5 गोष्टी वापरा, केस होतील लांब आणि दाट

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला; सस्पेन्स वाढला, VIDEO

SCROLL FOR NEXT