Car and Horse Accident Video Saam TV
व्हायरल न्यूज

Car and Horse Accident Video: भररस्त्यात कार अन् घोड्याचा विचित्र अपघात; थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Horse Accident Video Viral: आजवर तुम्ही अपघाताच्या अनेक घटना पाहिल्या असतील. मात्र एक घोडा आणि चारचाकीचा अपघात झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? असा अपघात फार कमी व्यक्तींनीच पाहिला असेल. अशात सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एका व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कार आणि घोडा यांचा अपघात झाल्याचं दिसतंय. (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भररस्त्यात एक कार उभी आहे. कारच्या आजुबाजूला माणसांची तुफान गर्दी पसरलीये. अशात घोडा देखील कारच्या मागच्या बाजूला उभा आहे. या घोड्याचे दोन्ही पाय कारच्या मागच्या बाजूची काच तोडून आत घुसलेत. तुटलेल्या काचेत घोड्याचे पुढचे दोन्ही पाय अडकलेत. कुणीतरी आपल्याला मदत करेल या आशेने हा घोडा येथे उभा आहे.

कारचालकाने कार थांबवली असताना त्याचवेळी घोड्याने वर उसळी घेतली असावी. मोठी उसळी घेतल्यावर पाय खली ठेवण्याऐवजी या घोड्याने कारचा आधार घेतला असावा. मात्र तेथे काच असल्याने काच फुटुन घोड्याचे पाय आतमध्ये आडकले. धारधार काच पायाला लागत असल्याने घोड्याला कोणतीही हालचाल करता येत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत यावर ४४ हजारांहून अधिक लाईक्स आलेत. नेटकऱ्यांनी देखील यावर विविध कमेंट केल्यात. सोशल मीडियावर प्राण्यांच्या अतरंगीपणाचे अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडिओ प्राण्यांमधील निरागस भाव दाखवतात. तर काही व्हिडिओमधून प्राण्यांच्या कृतीने खुपकाही शिकायला मिळतं. तसेच प्राण्यांचा अतरंगीपणापाहून नेटकरी पोटदुखेपर्यंत हासतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT