Fighting Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fighting Viral Video: मुंबईत भररस्त्यात राडा! कार चालक अन् बस कंडक्टर भिडले, व्हायरल VIDEO

Andheri Fighting Video: सोशल मीडियावर सध्या अंधेरीमधील एका घडलेल्या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये बस कंडक्टरला एका कार चालकाने मारले आहे. नक्की कारण काय ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

 Lokhandwala Viral Video: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात वाहतूक ही नेहमीच गडबडीत असते. बऱ्याचदा घाई-गडबडीत या रस्त्यांवर वादावादीचे प्रसंग घडतात. मात्र, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात नुकतीच घडलेली घटना ही फक्त भांडणांपूर्ती मर्यादित न राहता थेट मारहाणीवर पोहोचली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुंबईत थेट रस्त्यावर हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल(Viral) होत असलेला ही घटना मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला भागातील आहे. जिथे बस कंडक्टरने रस्त्यावरील उभी कार बाजूला घेण्यास सांगितले कार चालकाने बस कंडक्टरला मारहाण केली आहे. भररस्त्यात सुरु असलेला हा प्रकार काही नागरिकांनी मोबाईमध्ये कैद करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की,सुरुवीस बस कंडक्टर बसमधून खाली उतरतो आणि कार चालकाशी शांतपणे संवाद साधत असतो. मात्र, अचानक कार चालक आक्रमक होत कंडक्टरवर हात उगारतो आणि ढकलतो. धक्कादायक म्हणजे नंतर त्याच्यावर थेट हात उचलतो.

saamtvnews या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ (Video) सध्या अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल माध्यमांवर अशा अनेक घटना समोर येतात, ज्यावर नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त होतो. यावरही लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील काहींनी बस कंडक्टरची बाजू घेतली आहे तर काहींनी कार चालकाची बाजू घेतली आहे.

टीप: हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT