Bull FIght Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, थेट गाडीवर झेप घेतली अन्... थरारक व्हिडिओ

Viral Video: दोन्ही बैल एकमेकांच्या पाठीशी लागतात. अशातच एक बैल थेट रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाडीवर उडी घेतो. ज्यामध्ये गाडीच्या बोनेटचे मोठे नुकसान होते.

Gangappa Pujari

Bull FIght Viral Video:

सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा माध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहताना थरकाप उडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये भररस्त्यात दोन बैलांची झुंज सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे बैलांच्या या भांडणात एका गाडीचेही नुकसान होते.

मोकाट प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशा हल्ल्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये दोन बैल भररस्त्यात एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसत आहे.

बैलांच्या या भांडणात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडीचेही मोठे नुकसान होते. हे दोन बैल एकमेंकाशी असे काही तुटून पडलेत की पाहणाऱ्याचाही थरकाप उडेल. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या (Viral Video) व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भररस्त्यात, वर्दळीच्या ठिकाणी दोन बैलांची झुंज सुरू असल्याचे दिसत आहे. यानंतर दोन्ही बैल एकमेकांच्या पाठीशी लागतात. अशातच एक बैल थेट रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाडीवर उडी घेतो. ज्यामध्ये गाडीच्या बोनेटचे मोठे नुकसान होते.

भररस्त्यात ही लढाई सुरू असल्याचे पाहून परिसरातील लोकही घाबरुन जातात अन् इकडे तिकडे पळू लागतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशा प्राण्यांचा योग्य बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT